(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News Updates 12 December 2022 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात पॅरासाईट म्हणून अनधिकृत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
निवडणूक चिन्हाच्या लढाईत आज आयोगासमोर युक्तिवाद सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात होईल. याबरोबरच सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज हायकोर्ट निकाल जाहीर करणार आहे. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्हर्च्युअल रॅली होणार आहे. तर भूपेंद्र पटेल आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या विविध घडामोडीवर आमचं लक्ष असणार आहेत, याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ....
पुण्यात संघटनांकडून रिक्षा बंद आंदोलन
दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आलंय. रिक्षा बंदमधे सहभागी असलेले रिक्षाचालक 11 वाजता आर टी ओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करणार आहेत.
निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात
निवडणूक चिन्हाच्या लढाईत आज आयोगासमोर युक्तिवाद सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात होईल. धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू होणार आहे.
अनिल देशमुखांना जेल की बेल?, हायकोर्ट आज सुनावणार निर्णय
सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज हायकोर्ट निकाल जाहीर करणार आहे.
महामोर्च्याच्या नियोजनासाठी ठाकरे गटाची बैठक
ठाकरे गटाच्या शिवसेनेची आज महामोर्च्याच्या नियोजनासाठी बैठक होणार आहे. बैठकीत मोर्च्याचा मार्ग अंतिम करण्यात येणार आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज होणार व्हर्च्युअल रॅली
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्हर्च्युअल रॅली होणार आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर येथून शरद पवार यांच्या हस्ते या व्हर्च्युअल रॅलीचा शुभारंभ होणार आहे. काही नेते आपल्या जिल्ह्यातून रॅलीत सहभागी होणार आहेत.
भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
भूपेंद्र पटेल आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदेंसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील.
ईडीच्या याचिकेवर सुनावणी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.
गौतम नवलखा यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
शहरी नक्षलवाद प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी गौतम नवलखा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी.
वेंगुर्ले मराठी साहित्य संमेलन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मराठी साहित्य संमेलन आज होत आहे. या साहित्य संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने करण्यात येणार आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होईल.
चंद्रशेखर बावनकुळेंची हिंगोलीत पत्रकार परिषद
भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषद होणार आहे बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विविध बैठका आणि आढावा घेतला जाणार आहे.
हिंगोलीत शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा
ठाकरे गटाच्या वतीने कळमनुरी तहसील कार्यालयावर दे दणका मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी होणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात पॅरासाईट म्हणून अनधिकृत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात पॅरासाईट म्हणून अनधिकृत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलीय. या विद्यार्थ्यांना होस्टेलमधुन बाहेर जाण्यास सांगण्यात आलय. मात्र या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरु करण्यात आलय. कारवाई झालेले हे विद्यार्थी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर अंथरुन- पांघरून घेऊन आलेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र ज्यांना वसतीगृह मिळालय अशा विद्यार्थ्यांबरोबरच ज्यांना वसतीगृह मिळालेले नाही असे विद्यार्थी देखील बळजबरीने राहतात. अशा चोरुन राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलीय.
बारामती व्यापारी महासंघ बंद
बहुजन महापुरुषांच्या सतत होणाऱ्या अवमानबद्दल बारामतीतून निघणाऱ्या बहुजन समाजाच्या निषेध मोर्चा निमित्त बारामतीतील सर्व दुकाने उद्या दुपारी 12 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बारामती व्यापारी महासंघाने घेतला आहे.
महापुरूषांच्या अवमानाविरोधात उद्या बारामती बंद
महापुरुषांच्या सतत होणाऱ्या अवमानाबद्दल बारामतीतून निघणाऱ्या बहुजन समाजाच्या निषेध मोर्चा निमित्त बारामतीतील सर्व दुकाने उद्या दुपारी 12 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बारामती व्यापारी महासंघाने घेतला आहे.
मुंबईत गोवरग्रस्त रुग्णांची संख्या 462 वर, एका चिमुकलीचा मृत्यू
मुंबईत गोवरग्रस्त रुग्णांची संख्या 462 पर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 16 बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. आज एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. तर मुंबईत संशयित रुग्णांची संख्या 4936 झाली आहे. रुग्णालयात आज 146 मुले दाखल झाली आहेत. यातील 23 मुले ऑक्सिजनवर असून 5 आयसीयूमध्ये आहेत. तर1 व्हेंटिलेटरवर आहे.