Maharashtra News Updates: अलिबागच्या तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात, तहसीलदार मीनल दळवी लाच घेताना ताब्यात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आदित्य ठाकरे आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
आज राहुल गांधींची यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोहचणार आहे. आदित्य ठाकरे आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार. दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे यात्रेत उपस्थिती लावणार आहे. सकाळी 6 वाजता अर्धापूर, नांदेड येथून यात्रेला सुरुवात होईल. सकाळी 10 वाजता सकाळचा ब्रेक होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता चोरंबा फाटा, हिंगोली येथून पुन्हा पदयात्रेला सुरुवात होईल.
संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी
शिवसेना खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गुरुवारी वेळेअभावी ही सुनावणी होऊ शकली नव्हती. संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती.
कलिनच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल
सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल लागणार आहे. याप्रकरणी गुरुवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. या दरम्यान ईडीने सांगितले की, जॅकलिनविरोधात पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे तिला नियमित जामीन देऊ नये.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज आंदोलन
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भातील खासदारांच्या घरासमोर विदर्भवाद्यांकडून आज घेराव घातला जाणार आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या घराजवळही विदर्भवादी आंदोलन करणार आहेत. चंद्रपुरात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी खासदार बाळू धानोरकर यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे.
अजित पवार आज तळेगाव दाभाडे येथील कार्यक्रमांना उपस्थिती लावणार
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथे टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर इंद्रायणी भात खरेदीचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. अजित पवार शिर्डी अधिवेशनात शरद पवार आले त्यादिवशी उपस्थित नव्हते. तसेच सुप्रिया सुळेंबाबत सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावरही ते बोलले नव्हते. त्यानंतर ते प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.
निलेश लंकेंनी केला जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईचा निषेध
पोलीस ठाण्याच्या बाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बसण्यासाठी गाद्या आणून ठिय्या आंदोलन
जितेंद्र आव्हाड यांचा ज्या ठिकाणी मुक्काम आहे. त्या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बसण्यासाठी गाद्या आणून ठिय्या मांडत आंदोलन सुरु आहे
माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर अपघात, १० प्रवासी जखमी ..
भिवंडीत अनधिकृत बांधकामास संरक्षदेण्या साठी 50 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पालिका बिट निरीक्षकास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम फोफावत असताना त्यास संरक्षण देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या अर्थपूर्ण संबंधांवर नेहमीच टीका होत असताना भिवंडी महानगरपालिकेच्या बिट निरीक्षकास अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत एकास अटक केली आहे .रमाकांत म्हात्रे असे अटक पालिका प्रभाग समिती क्रमांक तीनच्या बिट निरीक्षकाचे नाव आहे.एका अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्यासाठी प्रत्येक स्लॅब नुसार पन्नास हजार रुपयांची मागणी बिट निरीक्षक रमाकांत म्हात्रे यांनी 13 ऑक्टोबर रोजी केली होती व सदर रक्कम त्रयस्थ व्यक्ती कडून स्वीकारण्याचे मान्य केले होते .या बाबत फिर्यादी यांनी ठाणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली असता तक्रारीची शहानिशा करीत बुधवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक 3 कार्यालयात कारवाई करीत रमाकांत म्हात्रे यास ताब्यात घेत अटक केली आहे .लाचलुचपत विभागाच्या या कारवाईने भिवंडी महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामास संरक्षण देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यात खळबळ माजली आहे हे नकी.
राज्यातील साखर कारखान्यांना ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना किती पैसै मोजायचे आहेत याचे दरपत्रक साखर आयुक्तांकडून जाहीर करण्यात आलय.
राज्यातील साखर कारखान्यांना ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना किती पैसै मोजायचे आहेत याचे दरपत्रक साखर आयुक्तांकडून जाहीर करण्यात आलय. यापेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखाने शेतकऱ्यांचा उस त्यांच्या शेतात ऊसतोड कामगार पाठवून गाळपासाठी घेऊन जतात. त्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या उसाच्या बीलातुन वजा केले जातात. मात्र साखर कारखाने तोडणी आणि वाहतुकीसाठी येणारा खर्च वाढवून दाखवतात असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील 200 साखर कारखान्यांचे प्रती मेट्रिक टन उसाचे तोडणी आणि वाहतुकीचे दरपत्रक जाहीर केलय. या दरपत्रकात नमुद करण्यात आलेली रक्कमच कारखाने शेतकऱ्यांच्या बीलातुन वजा करू शकणार आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना स्वतः उस तोडून साखर कारखान्यापर्यंत पोहचवायचा असेल तर त्यांना तशी मुभा देण्यात आलीय.