(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News Updates 05 December 2022 : नाशिकच्या दिंडोरीत अवकाळी पावसाची हजेरी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; 93 जागांवर आठशेच्यावर उमेदवार रिंगणात
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे 93 मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची पहिली बैठक आज
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज सकाळी बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशावेळी आज संध्याकाळी पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला ठाकरे गटातील नेते उपस्थित राहणार का हा देखील एक सवाल आहे. कारण वंचित बहुजन आघाडी सोबत ठाकरे गट गेल्यास महाविकास आघाडीचे काय असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महाविकास आघाडीची आज बैठक
दरम्यान, आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. अधिवेशन काळात मांडायच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच 19 तारखेला राष्ट्रवादीच्या शेतकरी मोर्चाबाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे.
सासू विरुद्ध सून, जळगाव दूधसंघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्याविरोधातील प्रचार मेळाव्यात खासदार रक्षा खडसे सहभागी
जळगाव दूध संघ निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत म्हटली तर मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे (Manda Khadse) आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यात होत आहे. रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपाच्या खासदार असल्याने साहजिकच त्यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने प्रचार करावा लागत आहे. याचाच अर्थ रक्षा खडसे यांनी सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या पॅनलला विजय करण्याचा आवाहन मतदारांना केलं आहे. त्यांचे हे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे यांच्याविरोधात असल्याने सासू आणि सुनेमधील ही लढत संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे
बार्शीतील चिखर्डे येथील दिव्यांग मुलाचे मृत्यू प्रकरण, गट विकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर मृत मुलावर अंत्यसंस्कार
बार्शीतील चिखर्डे येथील दिव्यांग मुलाचे मृत्यू प्रकरण
गट विकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर मृत मुलावर अंत्यसंस्कार
रात्री 10 वाजता गावातील स्म्शान भूमीत पार पडले अंत्यसंस्कार
जवळपास 30 तासानंतर मृत संभव कुरुळेचे अंत्यविधी झाले
Nashik News Update : नाशिकच्या दिंडोरीत अवकाळी पावसाची हजेरी
नाशिकच्या दिंडोरीत अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडलाय. आधीच थंडीचा सामना करत असताना अचानक पावसाने हजेरी लावंल्यानं द्राक्ष पिकावर रोग पसरण्याची शक्यता आहे. दिंडोरीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय.
Pune News Update : मांजाने गळा कापल्याने दौंडमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू
नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने दौंड शहरामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. पन्नालाल यादव असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. यादव हे आपल्या दुचाकीवरून कामाला निघाले असताना दौंड शहरामधील नगर मोरी चौकात कोणीतरी व्यक्ती नायलॉनच्या मांजाने पतंग उडवत होती. दुचाकी चालवताना पन्नालाल यादव यांना तो मांजा दिसला नाही. त्यामुळे त्यांचा गळा कापला गेला. नगरमोरी चौकापासून जवळच असलेल्या दौंड उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले. यादव यांची श्वसननलिका या मांजामुळे कापली गेली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
Gujarat Exit Poll Live: भाजपला गुजरातमध्ये स्वबळावर सत्ता, 128 ते 140 जागा मिळण्याची शक्यता, आपला 11 पर्यंत जागा
भाजपला यंदाच्या निवडणुकीत 128 ते 140 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. आपला गुजरातमध्ये 3 ते 11 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा गुजरातमध्ये सत्ता मिळणार असल्याची शक्यता आहे.
Coronavirus in India : आज राज्यात 22 नवीन कोरोना रूग्णांची नोंद; सक्रिय रूग्णांची संख्या 278
Coronavirus in India : आज राज्यात 22 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 37 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण 79,87,314 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील बरे होण्याचे प्रमाण 98.17% इतके झाले आहे. राज्यात आज एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% इतका आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 278 वर पोहोचली आहे. तर, सर्वाधिक रूग्ण पुण्यात आहेत. पुण्यात कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या 100 आहे.