Maharashtra News Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
25 February Headlines : Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यातील कसबा पेठेतील रविवार पेठ गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांनी केलाय. या प्रकारात पोलिस देखील सहभागी असून याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर उपोषणाला बसणार आहेत. याशिवाय आजपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान सुरू होणार. 25 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान शिवसेनेचे नेते, उपनेते यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी प्रत्येक मतदार संघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत.
रविंद्र धंगेकरांच कसबा गणपती समोर उपोषण
भारतीय जनता पक्षाकडून पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप करत असल्याचा रवींद्र धंगेकर यांनी आरोप केलाय. कसबा पेठेतील रविवार पेठ गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा धंगेकरांचा आरोप आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरवात करणार आहेत.
नवी मुंबईत एमआयएमचं पहिल राष्ट्रीय अधिवेशन
एमआयएमचं पहिल राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवस नवी मुंबईत होत आहे. अधिवेशनाला आमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्यासह देशातील महत्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ओवेसी पक्षातील पदाघधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. सकाळी 9.30 वाजता असदुद्दीन ओवेसी यांची रामाडा हॉटेल इथं पत्रकार परिषद होईल. सायंकाळी 7 वाजता मुंब्र्यात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून ओवेसी लोकांशी संवाद साधणार आहेत. 2
शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान
आजपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान सुरू होणार. 25 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान शिवसेनेचे नेते, उपनेते यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी प्रत्येक मतदार संघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेची झालेली पडझड पहाता ठाकरेंकडून थेट जनतेला साद घालायला सुरूवात केलीय. या अभियानात ठाकरे गटाकडून शिंदे गटाला थेट लक्ष केल जाईल. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यापासून ठाकरेंकडून थेट ग्रामीण पातळीवर संवाद साधायला सुरूवात केलीय.
काँग्रेस अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी 10 वाजता काँग्रेस अध्यक्षांचं भाषण होणार असून त्यानंतर लगेच सोनिया गांधींचं भाषण होणार आहे.
सुकेश चंद्रशेखरच्या खटल्याची सुनावणी
मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या खटल्याची आज राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत सुकेश चंद्रशेखर याने आम आदमी पार्टीला (आप) 60 कोटी रुपये दिल्याचे न्यायालयाला सांगितले होते आणि ही बाब दिल्लीच्या राज्यपालांना लेखी दिली आहे, असं सुकेशने सांगीतलं होत. सुकेशवर दोनशे कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे
आरबीआयने शुक्रवारी देशातील 5 सहकारी बँकांवर काही निर्बंध लादले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही बँकांवर मोठ्या कारवाईची मोठी बातमी येत आहे.
आरबीआयने शुक्रवारी देशातील 5 सहकारी बँकांवर काही निर्बंध लादले आहेत.
यात औरंगाबादच्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकचा देखील समावेश आहे.
बँकेतून पैसे काढण्याची मर्यादाबाबत काही निर्बंध लादण्यात आले आहे.
या बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता हे निर्बंध लादण्यात आले असल्याचं आरबीआयने म्हटले आहे.
गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट.....
शेवगाव तालुक्यातील सीमा हद्दीपासून जवळच असलेल्या नजीक बाबुळगाव ता. शेवगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या डीसलरी विभागात मोठा स्फोट झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली असून दर पाच मिनिटाला स्फोट होत असल्यामुळे घटनास्थळ बचाव कार्य करण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना शर्यतीचा प्रयत्न सुरू केलेला आहे.
अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील सीमा हद्दीचा जवळच असलेल्या नजीक बाभूळगाव ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील गंगामाई साखर कारखान्यात नेहमीप्रमाणे डीसलरी विभागात कामगार काम करीत असताना अचानक कसलातरी स्फोट झाल्याचा मोठा आवाज येऊन कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे कामगारांनी आपला जीव मुठीत धरून पळापळी सुरू केली. आग लागली घटनेची माहिती दोन्ही तालुक्यातील शासकीय यंत्रणाला मिळतात मंगल व रुग्णव आहे का घटनास्थळ दाखल झाले आहे.
वाशीम जिल्ह्यात हळद काढणीला सुरुवात...
खरिपाच्या मे आणि जून महिन्यात पेरणी करण्यात आलेल्या हळद काढणीला सुरुवात झाली आहे. अनेक नैसर्गिक अडचणीचा सामना करत आता हळद कादाह्नी करत आहे. अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलामुळे हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशीम जिल्ह्यात सहा हजार ११२ हेकटर क्षेत्रावर हळदीचा पिक पेरा केल्या गेला होता. नकद पिक म्हणून हळद पिका कडे वळले होते . मात्र आता कमी मिळणारे दर आणि त्यात वातावरणाचा फटका हळद पिकावर सर्वाधिक होतांना दिसतोय.
गंगामाई साखर कारखाण्यात मोठी आग
पैठण शेवगांव रोडवरील गंगामाई साखर कारखाण्यात डिसलरी विभागात स्फोट..पैठण एमआयडीसी अग्निशमन दल बचाव कार्यासाठी रवाना झाले आहे.
सोलापुरात प्रेमी युगुलाची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, मृत मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती
सोलापुरात एकाच झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाने आत्महत्या केलीय. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील मृत मुलगी ही अल्पवयीन आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सुरज चव्हाण असे या घटनेत मुर्त्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सुरज हा मोहोळ तालुक्यातला रहिवासी आहेत.