Maharashtra News Live Updates : भाजप आमदार पडळकर यांच्या नेतृत्वातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस
राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याने विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाबाबत सुनावणी होणार आहे. सलग तीन दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे.
दिल्ली
- महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. आजपासून पुढचे सलग तीन दिवस खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. आज ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने जेष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडतील.
मुंबई
- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विविध मुद्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
- भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संबोधित करणार आहेत.
- एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजपासून आमदार गोपाचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे आझाद मैदानावर आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.
- सरकारने संपाची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने गेली साडेपाच वर्षे तर केंद्र शासनाने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही.
- नवाब मलिक यांच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणास्तव मलिकांच्या जामिनावर तातडीनं सुनावणी घेणं हायकोर्टानं मान्य केले आहे.
नाशिक
- युवासेना अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे ( शिवसेना- शिंदे गट) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
- मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.
- संजय राऊत हे देखील सोमवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत.
अहमदनगर
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत.
- ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम यांच्या उपस्थितीत माऊली सभागृहात "शिवगर्जना" कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
चंद्रपूर
- शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडून सध्या शिवगर्जना अभियान सुरू आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहर, वरोरामध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन
उन्हाची तीव्रता लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल
उन्हाची तीव्रता लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल
सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू असणार जिल्हा परिषद शाळा
जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी काढले आदेश
जिल्हा परिषदेची शाळा उद्यापासून सकाळी सात वाजता भरणार
आता लालपरीवर दिसणार छत्रपती संभाजीनगर नाव
केंद्र शासनाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामकरण केल्यानंतर राज्य शासनाने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राज्य शासनाच्या महसूल-वन आणि नगरविकास विभागाचे आदेश जारी होताच आता एसटी महामंडळाने देखील औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्यातील प्रत्येक एसटीच्या विभागाला पत्र पाठवून ज्या ठिकाणी औरंगाबाद हे नाव असेल त्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे लिहिण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे, तसेच हे आदेश येत्या 24 तासात अमलात आणण्याचेही या पत्रात एसटी महामंडळाने म्हटले आहे.
पुरंदर तालुक्यात अफूची शेती, पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
दुचाकी आणि कार यांचा अपघात, दोन ठार
चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या २ गटांमध्ये तुफान राडा
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या शिवसेनेची शिवगर्जना यात्रा सुरु आहे. या यात्रेनिमित्त वरोरा शहरात आयोजित कऱण्यात आली होती. चंद्रकांत खैरे यांची जाहीर सभा, ही सभा दुपारी ३ वाजता निर्धारित कऱण्यात आली होती. मात्र त्या आधी भद्रावती शहरात खैरे यांची एक सभा आयोजित कऱण्यात आली, वरोरा येथील सभेच्या आधी भद्रावती शहरात सभा का आयोजित कऱण्यात आली. या साठी शिवसेना कार्यकर्ते होते नाराज, खैरे यांना भद्रावती येथील सभेत उशीर होत असल्याने त्यांनी आपल्या सभेत असलेल्या शिवसेनेच्या बाकी पदाधिकाऱ्यांना वरोऱ्याकडे रवाना केले.