Virar News: पालघर: विरारमध्ये इमारतीची भिंत कोसळून ३ महिला मजूर ठार

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2023 11:34 PM
Virar News: पालघर: विरारमध्ये इमारतीची भिंत कोसळून ३ महिला मजूर ठार

Virar News: पालघर: विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीचं काम सुरू होतं. त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

Bhandara News: भंडारा नगर पालिकेच्या डम्पिंग यार्डमधील वीज चोरी पकडली; महावितरणची कारवाई

Bhandara News:  भंडारा नगरपालिकेच्या जमनी येथील डम्पिंग यार्डमध्ये चोरीची वीज वापरीत असल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं. याप्रकरणी भंडारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरी पकडून 48 तासात दंडाची 45 हजार रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश बजावले आहे. या कारवाईनं मोठी खळबळ उडाली आहे. भंडारा नगरपालिकेच्या डम्पिंग यार्डमध्ये बांधकाम सुरू असून यासाठी चोरी ची वीज वापरली जात असल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांना लक्षात आल्यानं ती पकडून यासाठी वापरण्यात आलेला 600 फूट केबल महावितरणने जप्त केला आहे.

Bhandara News: भंडारा: तुमसर शहरातील अतिक्रमणावर चालला बुलडोझर; नगरपालिकेची कारवाई

Bhandara News:  भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील मुख्य बाजार पेठं, बावनकर चौकपासून जुना बस स्टॉप, नवीन बस स्टॉप परिसरातील अतिक्रमणावर तुमसर नगरपालिकेनं बुलडोझर चालवला आहे. व्यापाऱ्यांनी रस्त्यावर व मुख्य नाल्यावर दुकानं थाटली. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नाल्याची साफसफाई जोमात सुरू असून नाल्यावर दुकाने असल्याने नालेसफाई करण्याससुद्धा पालिकेला त्रास होत आहे. त्यामुळं पालिका प्रशासनानं पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.

बीडमध्ये झालेल्या तिहेरी अपघातामध्ये बापलेकाचा जागीच मृत्यू

Beed Accident : बीडच्या नेकनूरजवळ झालेल्या तिहेरी अपघातामध्ये बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेकनूर मांजरसुंबा रोडवर हा अपघात झाला. भरधाव कारने दोन दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये विनायक चौरे आणि विनोद चौरे या बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून भरधाव वेगात चालणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलं असून वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

बीडमध्ये झालेल्या तिहेरी अपघातामध्ये बापलेकाचा जागीच मृत्यू

Beed Accident : बीडच्या नेकनूरजवळ झालेल्या तिहेरी अपघातामध्ये बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेकनूर मांजरसुंबा रोडवर हा अपघात झाला. भरधाव कारने दोन दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये विनायक चौरे आणि विनोद चौरे या बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून भरधाव वेगात चालणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलं असून वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Yavtmal News: रोज मजुरी कराव की, पाणी भरावं... पंधरा दिवस उलटूनही नळाला नाही पाणी; यवतमाळ शहरात तीव्र पाणीटंचाई

Yavtmal News: यवतमाळ शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून  नागरीकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. अमृतची पाईपलाईन फुटल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हातपंपावर महिलांसह पुरुष मंडळीची मोठी गर्दी दिसत आहे. तर रोजमजूरी करणाऱ्या महिलांना रात्री अपरात्री कुपनलिकेवर पाण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे पाणी भरावं की, रोजमजुरी करावी असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील रहिवाशांना नळाला पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना बोअरवेल आणि हातपंपाचे पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. 


सध्या स्थितीत शहरातील खोजा कॉलनी, गाडगेनगर, अभिनव कॉलनी, संदीप मंगलम परीसर, जिल्हा परिषद कॉलनी, पिंपळगाव परिसर, वडगाव, वंजारी फॉल, वैभवनगर, विश्वशांती नगर, अनुश्री पार्क, साईबालाजी पार्क, सुरभी नगर, वाघापूर परिसर, बांगरनगर आदी परिसरात मागील पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी ओरड सुरू आहे.

Nanded News: नांदेड बेटमोगरा गावात आरोग्य शिबिराला गर्दी

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बेटमोगरा गावात आरोग्य शिबीर घेण्यात आले, त्यात रोगनिदान शिबीर आणि रक्तदान करण्यासाठी अनेक जण समोर आले. ग्रामीण भागात तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने घेतलेल्या या शिबिरात आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

Nanded News: अमित शहांच्या सभेला विक्रमी गर्दी होईल; खासदारांचा दावा

Nanded News: येत्या 10 एप्रिल रोजी नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय, या सभेला पन्नास हजारांहून अधिकचे लोक उपस्थित राहतील असा दावा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय. शहा यांची सभा ज्याजागी होणार आहे त्या जागेचे भूमिपूजन आज खासदारांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. शहरातील अबचलनगर भागातील खुल्या मैदानात ही सभा होणार असून त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

Cyclone Biparjoy : मान्सूनपूर्वी 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा धोका, वादळी वाऱ्यामुळे पाऊस लांबला

Cyclone Update : एकीकडे मान्सूनची (Monsoon) प्रतिक्षा लागली असताना दुसरीकडे चक्रीवादळाचा (Cyclone) धोका पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात 'बिपरजॉय' चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) निर्माण झाल्याने आता पाऊस (Rain Update) आणखी लांबला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 5 जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं. पुढील 24 तासांत याच प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला 'बिपरजॉय' असं नाव देण्यात आलं आहे. मान्सून आधी 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावरही परिणाम झाला आहे.


Mumbai Water Crisis:  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 20 दिवसांचा पाणी साठा; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त पुढील 20 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे... Read More
Sangli Crime: पोलीस असल्याचे भासवले, पेहरावही तसाच; सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्स शॉपी सशस्त्र दरोड्यातील आरोपी व गाडीचे फुटेज पोलिसांच्या हाती!
Sangli Crime News: शोरूममध्ये प्रवेश केल्यावर दरोडेखोरांनी पोलिस असल्याचे सांगितले. पेहरावही अगदी तशाच पद्धतीने होता. शोरुममध्ये घुसताच बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित येण्यास सांगितले. Read More
Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Sulochana Passed Away: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. Read More
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. Read More
Train Accident: 'हा' आहे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे अपघात! रेल्वेचा डबा नदीत उलटून गेला होता 800 जणांचा जीव
Train Accident: भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताविषयी जाणून घ्या, ज्यामध्ये सुमारे 800 ते 1,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. Read More
Maharashtra: परभणीतील भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई कधी? सेवेतून बडतर्फ करण्याचा अहवाल असताना शिक्षणमंत्र्यांनी कारवाई थांबवली?
Maharashtra: परभणीतील भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश असतानाही कारवाईची फाईल 6 महिने सरकारकडे पडून आहे, या अधिकाऱ्यांवर कारवाई नोमकी होणार कधी? हा प्रश्न आता उपस्थित होतोय. Read More
समृद्धी महामार्गावर तीन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृ्त्यू; लघुशंकेसाठी थांबणे जीवावर बेतले, अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू
Samruddhi Highway Accident : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झालेत , या तीन अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे Read More
Ban On FDC Drugs : ताप, डोकेदुखी, मायग्रेनवरील 14 औषधांवर बंदी; पॅरासिटॉमॉलसह कोडीन सिरपचाही समावेश, 'ही' औषधे आरोग्यासाठी घातक
Ban On Cocktail Drugs : केंद्र सरकारने ताप, डोकेदुखी, मायग्रेन आजारांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 14 धोकादायक औषधांवर बंदी घातली आहे. Read More
Megablock : मुंबईकरांनो, आज लोकल रेल्वेने प्रवास करताय? मध्य रेल्वेसह पश्चिम आणि ट्रान्स हार्बर लाईनवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
Local Megablock Sunday : आज रविवारी, 4 जून रोजी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. Read More
मोठी बातमी! मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Fatal attack on Mumbai Police team : दरम्यान या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


आज राज्यभर शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह आहे. रायगडवर या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे, 


शिवराज्याभिषेक सोहळा


आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने रायगडवरील कार्यक्रमाचे आयोजन खालीलप्रमाणे, 
 
सकाळी 7 वाजता – युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते ध्वजपूजन.
सकाळी 7.30 वाजता – शाहिरी कार्यक्रम.
सकाळी 9.30 वाजता – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन.
सकाळी 9.50 वाजता – संभाजी छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत.
सकाळी 10.10 वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना अभिषेक.
सकाळी 10.20 वाजता – शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक.
सकाळी 10.30 वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन.
सकाळी 11 वाजता – शिवाजी महाराजांची पालखी जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाईल.
दुपारी 12.10 वाजता – शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन.


कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा  



कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर शाहू महाराज यांच्या हस्ते 349 व्या राज्याभिषेक सोहळा होणार आहे. शाहू महाराजांचे पुत्र संभाजी राजे हे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहेत. तर त्यांचे वडील शाहू महाराज यांनी कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
लाल महलात शिवराज्याभिषेक, शरद पवारांची उपस्थिती
 
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील लाल महालात आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यास शरद पवार उपस्थित रहाणार आहेत. 
 
प्रदीप शर्मा यांची जामीनावर सुटका
 
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका होणार आहे. मनसुख हिरेंच्या हत्येप्रकरणी ते येरवडा कारागृहात होते. पुण्यातून सुटल्यानंतर तो मुंबईच्या घरी येणार आहे. 


'सामना'च्या आवारात हाय होल्टेज ड्रामा होणार?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेली काही दिवस मुंबईतल्या शाखांच्या भेटी घेत आहेत. आज श्रीकांत शिंदे प्रभादेवीच्या म्हणजे सामना कार्यालयाला लागून असलेल्या शाखेला भेट देणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या मुंबईतील शिवसेना शाखा संपर्क अभियानाअंतर्गत ही भेट आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर


मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेचा हा तिसरा जिल्हा दौरा आहे.
सकाळी 10 वाजता – मोपा विमानतळावर आगमन आणि रोड मार्गे सावंतवाडीत दाखल.
सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत सावंतवाडी संत गाडगेबाबा मंडई आणि इतर भूमीपूजनाचा कार्यक्रम.
सकाळी 11.30 वाजता – कुडाळ मध्ये शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, 
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश रणे, निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक उपस्थित राहणार आहेत.
 
पुढचे तीन दिवस हवामान विभागाचा अलर्ट


कोकण गोवा 3 दिवस मेघगर्जना, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट.
विदर्भात दोन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडकडाट, विदर्भात 7 आणि 8 जून उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
पुण्यात कमाल तापमानात वाढ होणार नाही.
 
आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात 


आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मागच्या बैठकी वेळी महागाई नियंत्रणात येत असल्याने आरबीआयनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशात पुन्हा एकदा आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे. महागाई दर आरबीआयच्या टॉलरन्स बॅंडमध्ये असल्याने ईएमआयमध्ये कोणतीही वाढ बघायला मिळणार नाही असे संकेत देण्यात आले आहे. सध्या रेपो रेट 6.50 टक्के आहे तर महागाई दर 5 टक्क्यांखाली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.