मोठी बातमी! मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Fatal attack on Mumbai Police team : दरम्यान या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fatal attack on Mumbai Police team : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली असून, तपासकामी आलेल्या मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पोलीस भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या या पथकावर 30 ते 32 लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्यांसह कुऱ्हाडीने हल्ला चढवल्याने खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस घोटाळ्यातील संशयित आरोपींना देखील जमावाने पळवून लावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद चितळकर यांनी वैजापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सद्या ते गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत आहे. दरम्यान पोलीस भरती प्रकरणाचा तपास करत असताना ते आपल्या पथकासह छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथे जनकसिंह सिसोदे आणि संतोष गुसिंगे या दोन संशयित आरोपींच्या चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस देखील होते. दरम्यान गावात गेल्यावर त्यांनी आरोपींच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करत जमाव जमा केला. तर यावेळी 30 ते 32 लोकं लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाड घेऊन जमा झाले. तसेच जमवाकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली. तसेच जमावातील एकाने हातातील कुऱ्हाड घेऊन थेट पोलीस कर्मचारी विनोद चितळकर यांच्या डोक्यावर हल्ला केला. मात्र त्यांनी वेळीच स्वतःचं बचाव करत वार चुकवल्याने मोठं अनर्थ टळला. पण याचवेळी त्यांच्या ओठाला कुऱ्हाडीचा दांडा लागला.
पोलीस कर्मचाऱ्यानेच फोनवरून दिली चिथावणी
पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दरम्यान पोलीस त्यांना आपले ओळखपत्र दाखवत समजून सांगता असताना याचवेळी तिथे असलेल्या पवन बम्मनावत याने सदर ओळखपत्र पाहण्यासाठी घेवून न पाहताच हिसकावुन फेकुन दिले. तसेच विठ्ठल गबरु बम्मनावत नावाच्या व्यक्तीने पोलिसांना दम देवून थांबा, माझा मेहुना रुपसिंग रामसिंग गुसिंगे हे पोलीस असून त्यांना फोन लावतो वं तुला दाखवित असा दम दिला. तसेच पोलीस अमंलदार रुपसिंग रामसिंग गुसिंगे यांच्या मोबाईल क्रमांक 9158****** वर फोन लावला. फोन स्पीकरवर टाकुन विठ्ठल बमनावत यांनी त्यास सांगितले की, गाडीत सात ते आठ लोक असून पोलीस असल्याचे सांगत आहे. तेव्हा फोनवर बोलत असलेला पोलीस अंमलदार म्हणाला की, गाडीची पासिंग कुठली आहे. तेव्हा विठ्ठल म्हणाला की, गाडी गडचिरोलीची आसून, पोलीस भरती पेपरचे मॅटर आहे. त्यावेळी पोलीस अमलदार रुपसिंग रामसिंग गुसिंगे म्हणाले की, गाव गोळा करून गाडी जावू देवू नका, त्यांना सर्व मिळून निट करा व बंमकाव असे म्हणून फोन कट केला. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनेच फोनवरून जमावाला चिथावणी दिल्याचे समोर आले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Success Story : देशसेवेत पतीचं निधन, पदरी दोन लेकरं; संकटावर मात करुन अजिता बागडेची पोलीस भरतीत निवड