Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
चोरट्याकडून स्वत:च्याच घरात हल्ला झाल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेणारा बॉलिवूडचा नवाब अखेर आज घरी परतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलीलावती रुग्णालयातून सैफ अली खानला आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, आपल्या काळ्या रंगाच्या कारमधून पांढरे कपडे घातलेला सैफ नवाबी रुबाबात बाहेर पडला.
कारमधून बाहेर येताच सैफ अली खानने आपल्या चाहत्यांना हात दाखवून अभिवादन केले. अंगावर पांढरा शर्ट अन् निळी जिन्स घालून सैफ घरी परतला.
सैफ अली खानच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त आजूबाजूला दिसून आला. यावेळी, हसकीसी स्माईल आणि डोळ्यावर गॉगल असलेल्या सैफने थंब दाखवत आपण ठीक असल्याचे सूचवले.
दरम्यान, सैफ अली खानचे रुग्णालयातून बाहेर आल्यानंतरचे फोटो समोर आले असून त्याच्या खांद्यावर बँडेज पट्टी लावल्याचे दिसून येते.
16 जानेवारी रोजी वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरी चोरट्याने मध्यरात्री चोरीची प्रयत्न केला. यावेळी, अभिनेता सैफ अली खानसोबत त्याची झटापट झाली. त्यामध्ये, चोरट्याने सैफवर चाकूने वार केला होता.
चोरट्याकडून झालेल्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला रात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली.
रुग्णालयातील शस्त्रक्रिया व उपचारानंतर आज सैफ अली खान त्याच्या घरी परतला असून बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याच्या प्रकृतीची विचारपूस केलीय