Maharashtra News Updates: विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. राज्यात हनुमान जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, सत्ताधारी भाजपचा आज स्थापना दिवस आहे. RBI पतधोरण जाहीर करणार आहे. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
दिल्ली
– संसदेच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. 14 मार्चपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात आदानी आणि राहुल गांधी मुद्यावरून गोंधळामुळे कामकाज होऊ शकलं नाही.
– आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे, संध्याकाळी 6.30 वाजता.
– श्रद्धा वालकर आरोपी आफताब वर आरोप निश्चितीसाठी साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे.
- भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेन्द्र मोदी सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेन्द्र मोदी भाजपा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.
अमरावती
- खासदार नवनीत राणा यांच्याकडून सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत सामुहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे.
मुंबई
- आरबीआयचं पतधोरण आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून सकाळी 10 वाजता जाहीर करणार आहेत. 25 बेसिस पॉईंट्सनं रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे.
- डॉ. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरता रद्द करण्याच्या निकालाला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. त्यावर आज सुनावणी होईल. सदावर्तेंनी वकिली पेशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलनं शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
- जेईई मेन ही परीक्षा पुढे ढकलण्यासह आयआयटीमध्ये प्रवेशास पत्र होण्यासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करावा, अशी मागणी करत वकील आणि सामाजिक कर्यकर्ता अनुभा श्रीवास्तव-सहाय यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच जेईई मेन परीक्षा घेण्याबाबत आणि परीक्षेच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेनं (एनटीए) 15 डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेलाही याचिकेतून आव्हान दिलेलं आहे, त्या याचिकेवर आज सुनावणी होईल.
- ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणांत हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांसह त्यांच्या सीएनं दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी.
पुणे
- पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे मतदारसंघातील मुलभूत सुविधांसंदर्भातल्या प्रश्नासाठी महापालिकेसमोर उपोषण करणार आहेत. रिपोर्टर - मिकी
नाशिक
मनमाडमधील हनुमान जयंतीच्या निमित्त नांदगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा माता यात्रोत्सवात आजपासून प्रारंभ होतो. पाच दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात पारंपारिक प्रथेप्रमाणे बारागाड्या, मल्लखांब, देवीचा मुखडा आणि पालखी मिरवणूक, वीर, आदी पारंपारिक कार्यक्रम होणार आहे.
जळगाव
- हनुमान जयंती निमित्त जामनेर तालुक्यातील रोतवद येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलाय. 20 फूट उंच मूर्तीला मध्यरात्री पासून शेंदूर आणि लोण्याचा लेप लावण्यात येणार आहे.
धुळे
- चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त आज खान्देश कुलस्वामिनी एकवीरा देवीची रथयात्रा शहरातून निघणार आहे. देवीची रथयात्रा पारंपारिक मार्गावरून काढण्यात यावी अशी मागणी मंदिराच्या विश्वस्तांकडून केली जात आहे. मात्र याला पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र आपण पारंपारिक मार्गावरूनच रथयात्रा काढणार असल्याच्या निर्णयावर मंदिर प्रशासन ठाम आहे.
- शहरातील प्राचीन लालबाग हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. मंदिराला आकर्षक सजावट करून उत्सव साजरा केला जातो.
नंदुरबार
- मंत्री विजयकुमार गावित आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी दंगलग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहेत. कायदा सुव्यवस्था संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशीही बैठक घेणार आहेत.
नागपूर
- भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर मध्ये भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
भंडारा
- कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज विविध कार्यक्रमांबरोबर हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
- जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती साजरी होणार आहे. भंडारा शहरातील भृशुंड गणेश मंदिर, तुमसर येथील चांदपूर येथील प्रसिद्ध गणेश मंदिर, सकाळी 10 वाजता.
Thane News: ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाणे न्यायालयाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
Thane News: ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाणे न्यायालयाचा दिलासा
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केला गेला होता गुन्हा दाखल
शिवसेनेच्या वतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात केला होता गुन्हा दाखल ,तर भाजपच्या वतीने नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये केला होता गुन्हा दाखल
या प्रकरणात रोशनी शिंदे यांना ठाणे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Nashik News: नाशिक: सटाण्यात अवकाळी पावसाची हजेरी, कांद्यासह इतर शेतपिकाचे नुकसान होण्याची भीती
Nashik : नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आखतवाडे परिसरात आज सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली..आज झालेल्या अवकाळी पावसाने कांद्यासह शेतीपिकांचे नुकसान होणार आहे..
कर्नाटकातील नेऊन अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे रॅकेट उघड
धाराशिव जिल्हा रुग्णालयाच्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक पथकाने अवैधरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे यातील आरोपीत डॉक्टर हा गर्भवती महिलांना कर्नाटकात नेऊन हा सगळा प्रकार करायचा अशी माहिती आहे. या प्रकारणात एका एजंटला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून मोबाईल, महिलांची यादी असे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. धाराशिव जिल्हा रुग्णालयाच्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक पथकाने पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केलीय. कर्नाटकातल्या कलबुर्गी येथील डॉ. गुरुराज कुलकर्णी हा अवैधरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करत असल्याची माहिती धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयातील पथकाला मिळाली होती. पथकाच्या सदस्यांनी सापळा रचत एका गर्भवती महिलेस वीस हजार रुपये देऊन एजंटमार्फत या डॉक्टरकडे पाठवण्याचा प्लॅन केला. मात्र डॉक्टरने अचानक ठिकाण बदलले. त्यामुळे या प्रकरणातील एजंट खुदास कादरी हा एकटाच पथकाला रंगेहाथ सापडला. त्याच्याकडून मोबाईल, महिलांची यादी तसेच मागणी केलेल्या वीस हजार रुपये असे जप्त करत रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी डॉ. गुरुनाथ कुलकर्णी हा कलबुर्गी येथे अवैधरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करतो अशी माहिती देखील पथकला प्राप्त झाली. धक्कादायक बाब म्हणजे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईत देखील डॉ. गुरुराज कुलकर्णी याचे नाव समोर आले होते. या डॉक्टरचा एजंट जरी ताब्यात सापडला असला तरी मास्टरमाइंड डॉक्टरवर अजूनही कारवाई होत नसल्याने डॉक्टरला कोण पाठीशी घालतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान
राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल.
Mumbai News : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना धक्का; नियमित जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला
Mumbai News: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा नियमित जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला
हायकोर्टाच्या आदेशानंतर विशेष एनआयए कोर्टानं पुन्हा घेतली होती सुनावणी
यापूर्वी 5 सप्टेंबर 2022 रोजी कोर्टानं नाकारला होता जामीन
ज्याला नवलखा यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं, ज्यावर सुनावणीअंती हायकोर्टानं तो आदेश रद्द करत पुन्हा सुनावणी घेण्याचे दिले होते निर्देश
शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं तळोजा मध्यवर्ती कारागृहातून हलवल्यानंतर नजरकैदेत त्यांच्या घरी ठेवण्यात आलंय