Maharashtra News Updates 5th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळीचा कहर, शेती पिकांना मोठा फटका; तर वादळी वाऱ्यामुळं कार्यक्रमात अडथळा
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rains) थैमान घातलं आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळं कांदा, मका, भाजीपाला यासह फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, बळीराजा संकटात.
बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कांदा, मका, भाजीपाला, फळबाग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.
Pune DRDO Director Arrested : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या अर्थात डीआरडीओच्या संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला काही संवेदनशील माहिती दिल्याचा संशय एटीएसला संशय आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास आता पुणे पोलिस करत आहेत. डॉ. प्रदीप कुरुलकर असं अटक केलेल्या संचालकांचं नाव आहे.
डीआरडीओ ही संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. या संस्थेच्या पुण्यातील संचालकांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संचालकाने व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करुन एटीएसने त्यांना अटक केली आहे.
पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालकांनी त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह (PIO) चे हस्तक असलेल्या व्यक्तीसोबत ही संवेदनशील माहिती शेअर केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअॅपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहिले असल्याची माहिती आहे. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
Ratnagir: लोटे एमआयडीसी मधील ओरोमा इंटरमिजिएट कंपनीमध्ये मोठी आग
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील आरोमा इंटरमिजिएट्स या कंपनीमध्ये नायट्रिक ऍसिड गॅस लिकेज होऊन मोठी आग लागली या आगीमध्ये सुदैवाने कोणीही कामगार जखमी नाही मात्र गुणदे तलारीवाडी येथील पाच ते सहा ग्रामस्थांना गॅस ची किरकोळ बाधा झाली असल्याचे समोर आले आहे, कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ही आग इतकी मोठी होती की दोन किलोमीटर लांबून या आगीच्या धुराचे लोट दिसत होते नजीकच्या लोक वस्ती मधील लोक देखील मोठ्या प्रमाणावर घाबरले होते एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली असून गॅस लिकेज मुळे झालेल्या या दुर्घटनेमुळे एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे
राजीनामा देण्याचा शरद पवार यांचा प्रस्ताव समितीने फेटाळला
Sharad Pawar Resignation : राजीनामा देण्याचा शरद पवार यांचा प्रस्ताव समितीने फेटाळला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीचा निर्णय
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता लवकरच सनदी अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या, पुढील आठवड्यात मंत्रालयातील 20 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार
Transfer of Officers : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता लवकरच सनदी अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या
पुढील आठवड्यात मंत्रालयातील 20 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या
या आठवड्यात दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर पुढील आठवड्यात तब्बल वीस सनदी अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या
राज्याचे मुख्य सचिव पदी मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग
वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात मुख्य सचिव, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा सुरु
शरद पवार सकाळी साडेदहा वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार
Sharad Pawar News : शरद पवार सकाळी साडेदहा वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार
सकाळी अकरा वाजता प्रदेश कार्यालयात कमिटी प्रस्ताव पारित करेल आणि त्यानंतर तो शरद पवार यांना कळवण्यात येईल
समृद्धी महामार्गावर वाहन थांबविण्यास मनाई असताना मेहकरजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा, एक्स्प्रेस वेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन
Buldhana News : नागपूर-मुंबई हाय स्पीड एक्स्प्रेस वे म्हणजेच समृद्धी महामार्गावर किमान वेग मर्यादा 120 किमी प्रती तास आहे. त्यामुळे या महामार्गावर अनधिकृतपणे वाहन थांबवण्यास सक्त मनाई आहे. मात्र मेहकर इथे पेट्रोल पंपाजवळ समृद्धी महामार्गाच्या मुख्य लेनवर आणि लेन शेजारील जागेत अनेक वाहनधारक आपली वाहने थांबवून, महामार्गाच्या शेजारी अनधिकृतपणे सुरु असलेल्या टपऱ्या आणि हॉटेलवर थांबतात. यामुळे मात्र भरधाव वेगाने जाणारी वाहने अशा थांबलेल्या वाहनावर धडकून अनेक अपघात झालेले आहेत. तरीही परिवहन आणि MSRDC यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. आज सकाळपासून समृद्धी महामार्गावर अशी अनेक वाहनांच्या रांगा मेहकरजवळ दिसत आहेत.