Maharashtra Live Updates : वर्धामध्ये मुसळधार पाऊस; हिंगणघाट बाजार समितीमधील शेतमाल भिजला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
APMC Election Result Live Updates : बाजार समित्यांच्या निवडणुकीत कौल कोणाला? आज स्पष्ट होणार
APMC Election 2023 Result Live Updates : सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Agricultural Produce Market Committee) रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी मतदान प्रक्रिया होऊन निकालही जाहीर झाले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल अद्याप बाकी आहेत. आजही काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पारपडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय मिळवला आहे.
दरम्यान, या बाजार समित्यांच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. तर बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी गटालाही धक्का बसल्याचे चित्र आहे. राहिलेल्या ठिकाणी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे.
राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटता सापडले आहेत. राज्यातील बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये शेती पिकांसह घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळं उघड्यावर पडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात रात्री अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा आहे. बुलढाण्यात आजचं तापमान हे 15.2 अंश सेल्सिअस आहे. थंड हवेमुळं मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बुलढाण्यात गेल्या 70 वर्षात एप्रिल महिन्यातील आजचं नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
Weather : राजधानी दिल्लीसह देशातील 'या' राज्यात पावसाचा इशारा, उष्णतेपासून मिळणार दिलासा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather Update Today : देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पावसाची बॅटिंग सुरु आहे. या अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) अनेक ठिकाणी शेती पिकांना फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं राजधानी दिल्लीसह (Delhi) भारतातील इतर राज्यात पुन्ह अवकाळी पावासाचा इशारा दिला आहे. यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळं देशातील उत्तरेकडील राज्यांसह अनेक ठिकाणी वातावरण आल्हाददायक झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळं नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या. नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले होते. मात्र, आता या कडक उन्हापासून आणि दमट उकाड्यापासून सुटका होण्याची आशा आहे. अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हिमालयीन राज्यांमध्ये पावसासोबत हिमवर्षावही होऊ शकतो. उत्तरेकडील भागात जोरदार वाऱ्यासह पावसामुळे आयएमडीने ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. या दिवसांत केदारनाथ धाममध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनाही तेथे सतत बर्फवृष्टीचा सामना करावा लागत आहे.
Mumbai: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रात्री 12 वाजता हुतात्मा चौकात जाणार; संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करणार
Mumbai: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रात्री 12 वाजता हुतात्मा चौकात जाणार; संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करणार
Thane Kalyan News: भर रस्त्यात तलवारीने वार करत दोन तरुणांना केले जखमी; नांदिवलीतील घटनेने खळबळ
Kalyan News: जुन्या वादातून फिल्मी स्टाईलने पाठलाग करत चार जणांनी भर रस्त्यात तलवारीने वार करत दोन तरुणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण नांदीवली परिसरात घडली
Wardha News: वर्धामध्ये मुसळधार पाऊस; हिंगणघाट बाजार समितीमधील शेतमाल भिजला
Wardha News: वर्ध्याच्या हिंगणघाट येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेला शेतमाल भिजला. पावसाचा अंदाज असताना देखील बराचसा शेतमाल उघड्यावर राहिला होता.
बारसू रिफायनरीवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवरुन चर्चा
बारसू रिफायनरीवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवरुन चर्चा
आंदोलक सत्यजित चव्हाण आणि त्यांच्या टीम सोबत चर्चा केल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली
आंदोलकांकडून शरद पवार यांच्याशी रिफायनरी का नको यासाठी मागील तासाभरापासून चर्चा
बैठकीला जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित
जळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचे 9 उमेदवार विजयी
जळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचे 9 उमेदवार विजयी झाले असून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पॅनल एका जागेने आघाडीवर आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाजप शिंदे गटाचे सहकार पॅनल चे ८ उमेदवार विजयी झाले असून एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या ठिकाणी महाविकास आघाडी व भाजप शिंदे गटांमध्ये काटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिकृत निकाल घोषित होणे बाकी आहे.