सातारा: डॉक्टरांच्या मारहाणीला कंटाळून युवकाची आत्महत्या; मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण, टप्पा शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार हा मार्ग 80 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग,हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, 56 टोल बूथ, 6 वे ब्रिज अशा सुविधांचा समावेश आहे.
पॅकेज क्र 11,12 आणि 13 चं इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचं काम पूर्ण झालंय
दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये झाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरूवारी रात्री मुक्कामी असणार आहेत. सकाळी 10 वाजता नूतन शासकीय विश्रागृहाचे भूमिपूजन करून इतर विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. कोहिनूर मंगल कार्यालय येथे भाजपचा मेळावा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत आज कन्नड येथील सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर येथे येणार आहेत.
संत गजानन महाराज पालखीचे आज शेगाव येथून प्रस्थान
येत्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी संत गजानन महाराज पालखीचे आज शेगाव येथून प्रस्थान होणार आहे. पहाटे 5 वाजल्यापासून पालखी प्रस्थानाची तयारी सुरू होऊन सकाळी 7 वाजता साधारण 700 वारकऱ्यांसह संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरसाठी रवाना होईल. पालखीचे यंदा 54 वे वर्ष आहे. जवळपास साडेपाचशे किलोमीटर अंतर तीस दिवसात पूर्ण करून 27 जून रोजी पालखी पंढरपूरात दाखल होईल.
समीर वानखेडेंनी शाहरूख खानकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणावर आज हायकोर्टात सुनावणी
समीर वानखेडे प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी
समीर वानखेडेंनी शाहरूख खानकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणावर आज हायकोर्टात सुनावणी. याप्रकरणातील एक आरोपी सॅम डिसोझाची हायकोर्टात याचिका. सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआर मधून नाव वगळण्याची याचिकेत मागणी. एनसीबीचा खबरी असलेला सॅम डिसूजा कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणा दरम्यान चर्चेत होता.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 78 व्या जयंतीनिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 78 व्या जयंतीनिमीत्त विलासबाग बाभळगाव येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
Sameer Wankhede: मुंबई: समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरने चैत्यभूमीवर केले बाबासाहेबांना वंदन
Sameer Wankhede: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक प्रकरणी सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर सोबत आज दादर चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनास आले होते. त्यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन केले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
Beed News: बीड: अवैध वाळू माफियांची मुजोरी, जिल्हाधिकारी यांच्या गाडीलाच टिप्परने कट मारल्याने खळबळ
Beed News: बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे या संभाजीनगरवरून बीडकडे येत असताना मध्यरात्री विना नंबरच्या वाळूच्या टिप्परने कलेक्टरांच्या गाडीला कट मारला. विशेष म्हणजे या टिप्परला नंबरही नव्हता. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला. यावेळी कलेक्टरांच्या गाडीने वाळुच्या टिप्पर गाडीचा पाठलाग केला. पाडळसिंगी जवळच्या एका सर्व्हिस रोडवर टिप्पर चालकाने आपली गाडी घेत रस्त्याच्या मध्यभागी गाडीमधील वाळू रस्त्यावर टाकून टिप्पर चालक तेथून पसार झाला. रस्त्यावर वाळू पडल्याने कलेक्टरांच्या गाडीला त्याचा पाठलाग करता आला नाही. थेट कलेक्टरांच्या गाडीला वाळू माफियांनी लक्ष केल्याने याची गंभीर दखल यंत्रणेने घेतली आहे.























