Maharashtra Live Updates : भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध केलं जातंय, दुसऱ्या पक्षातील नेत्याच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते; उद्धव ठाकरेंचा आरोप
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राधाकृष्ण विखे पाटील
आताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते, मात्र आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी, असं वक्तव्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. शिर्डी मतदारसंघातील राहाता इथे प्रकट मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. शरद पवार राज्याला नेहमी कन्फ्युज ठेवतात. मात्र आता अजितदादांनी त्यांना सुद्धा कन्फ्युज केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मनात काय हे कोणाला समजणार? असं मिश्किल भाष्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांबाबत केलं.
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचं मला टेन्शन येतं : पंकजा मुंडे
महाराष्ट्रात इतके राजकीय भूकंप झाले याचं मला टेन्शन येतं. माझा महाराष्ट्र कसा राहिल? याचं मला टेन्शन येतं. मात्र या संदर्भात मला काहीही माहित नाही. राज्यातले नेते याबाबत निर्णय घेतील. भाजपाला अतिरिक्त नेत्यांची गरज असेल तर हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी नाही, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या बीडमध्ये बोलत होत्या.
अनेकांना मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं, मात्र प्रत्येकाला होता येत नाही : देवेंद्र फडणवीस
मी त्यांची मुलाखत पाहिलेली नाही. कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडू शकतं. त्यात काही वावगं नाही. अनेकांना असं वाटते की मुख्यमंत्री व्हावे मात्र प्रत्येकाला होता येतं असं नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दिल्लीतील घर सोडताना राहुल गांधी भावूक
सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगलाही सोडावा लागला आहे. हा शासकीय बंगला सोडताना राहुल गांधी भावूक झाल्याचं दिसून आलं. ही सत्य बोलण्याची किंमत मी चुकवत आहे, मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
कोरोनामुळे जगभरात बालविवाहाच्या प्रमाणात वाढ
कोरोना काळात जगामध्ये अनेक उलथापालथी झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्न कमी वयात झाल्याचं युनिसेफने त्याच्या एका अहवालात म्हटलं आहे. या काळात शाळा बंद असल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतात या काळात 2.66 कोटी मुलींची बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
Uddhav Thackeray : भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध केलं जातंय, दुसऱ्या पक्षातील नेत्याच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते; उद्धव ठाकरेंचा आरोप
भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध केलं जातंय, दुसऱ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांचे आरोप झालेल्यांना भाजपमध्ये घेतलं जातंय. दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
Uddhav Thackeray Pachora Sabha: ज्यांनी भगव्याला कलंक लावला, ते हात कायमचे गाडा - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Pachora Sabha: ज्यांनी भगव्याला कलंक लावला, ते हात कायमचे गाडा असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर, यांना जसं घोड्यावर चढवलं होतं तसं आता खाली खेचा, असं आवाहन करत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray Pachora Sabha: पाठीवर वार करणारी औलाद आमची नाही - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Pachora Sabha: सगळे घोषणा देत होते, कोण आला रे कोणा आला? गद्दारांचा बाप आला. पण ही अशी घाणेरडी औलाद आमची असू शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. पाठीवर वार करणारी तर सोडाच, पण आईच्या कुशीवरती वार करणारी औलाद आमची नाही, असेही ते म्हणाले.
Uddhav Thackeray Pachora Sabha: सभेत घुसणार म्हणणाऱ्या घुशी खुप पाहिल्या - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Pachora Sabha: सभेत घुसणार म्हणणाऱ्या घुशी खुप पाहिल्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे. घुशींना बिळातून काढून आपटणार, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.
शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला कळत नाही - उद्धव ठाकरे
जल्लोष पाहिल्यावर शिवसेना कुणाची हे कळतं, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तर, शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला कळत नसल्याचंही ते म्हणाले.