Maharashtra News Live Updates : अखेर नऊ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
IPL Playoffs : आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा! गुजरातच्या विजयासह मुंबई प्लेऑफमध्ये दाखल
Mumbai Indians Qualified for Playoffs : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील शेवटचे डबल हेडर सामने रोमांचक ठरले. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) कडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bangalore) पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे. पराभवासह आरसीबी संघाचं आयपीएल 2023 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. यामुळे चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.
आरसीबीच्या चाहत्यांची निराशा! गुजरातच्या विजयासह मुंबई प्लेऑफमध्ये दाखल
आयपीएल चॅम्पियन बनण्याचं आरसीबी संघाच्या स्वप्नावर पुन्हा एकदा पाणी फिरलं आहे. आयपीएल 2023 च्या प्लेऑफसाठी गुजरात, चेन्नई, लखनौ आणि मुंबई संघ पात्र ठरले आहेत. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात 20 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघाकडे 17 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लखनौ आणि चौथ्या क्रमांकावर मुंबई संघ आहे. लखनौ संघाकडे 17 तर मुंबई संघाकडे 16 गुण आहेत. आता प्लेऑफमध्ये गुजरात विरुद्ध चेन्नई आणि दुसऱ्या सामन्यात लखनौ विरुद्ध मुंबई लढत पाहायला मिळणार आहे.
G20 Kashmir Meeting: जी 20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक, श्रीनगरमध्ये तीन दिवसीय बैठकीच आयोजन
G20 Kashmir Meeting: काश्मीरमध्ये आजपासून तीन दिवसीय जी-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चीन, तुर्की आणि सौदी अरब हे बैठकीत सहभागी होणार नाहीत. बैठकीत 25 देश सहभागी होतील अशी माहिती आहे. दुपारी 3 वाजल्यापासून बैठकीला सुरूवात होणार आहे.
श्रीनगरच्या डल लेकमध्ये असलेल्या शेर - ए- काश्मिर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये (SKICC) ही बैठक होणार आहे. या बैठकीत 25 देशातील 60 पेक्षा अधिक प्रतिनिधी तसेच जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यटन क्षेत्राशी जोडलेले लोक सहभागी होणार आहेत. जी20 च्या पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कडक बंदोबदस्त ठेवण्यात आला आहे. SKICC च्या दिशेने जाणारे दोन्ही रस्ते पुढील दोन दिवसांसाठी सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रतिनिधींची संख्या पाहता सुरक्षेच्या कारणास्तव गुलमर्गचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
Wrestlers Protest: "मी नार्को टेस्टसाठी तयार, पण कुस्तीपटूंचीही..."; बृजभूषण यांनी घातली मोठी अट
Brij Bhushan Sharan Singh News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा (Gonda) येथील भाजप (BJP) खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट किंवा लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, पण विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांचीही टेस्ट व्हायला हवी, अशी अटही त्यांनी घातली आहे.
बृजभूषण शरण सिंह पुढे म्हणाले की, "जर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया त्यांची टेस्ट करण्यास तयार असतील, तर पत्रकारांना बोलावून त्यासंदर्भात घोषणा करा. मी त्यांना वचन देतो की, मीही यासाठी तयार आहे." तसेच, पुढे बोलताना त्यांनी ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. "मी यापूर्वीही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि यापुढेही या वक्तव्यावर ठाम राहीन हे मी माझ्या देशवासियांना वचन देतो." दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करुन यासंदर्भात मागणी केली.
Beed News : बीड: केज अंबाजोगाई रोडवर बर्निंग कारचा थरार वायरिंगने पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून खाक
Beed News: केज अंबाजोगाई रोडवर धावत्या कारमध्ये बिघाड झाल्याने आग लागली. यामध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. ही कार अंबाजोगाईवरून केजकडे येत होती. त्यावेळी अचानक कारने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
Jayant Patil: अखेर नऊ तासाच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर पडले; कार्यकर्त्यांचा गराडा
Jayant Patil: राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांची आज तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
Pune Rains: पुणे: वादळी वाऱ्यासह बारामती शहर आणि परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात
Pune News: पुणे: आज सायंकाळी बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सायंकाळी सात वाजता सुरुवात झाली. गेल्या काही दिवसापासून या परिसरात उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. आज सायंकाळी वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले आणि सात वाजता वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली.
सोलापूर: पंढरपूरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; फळपिकांचे नुकसान
Maharashtra Rains: सोलापूर: मान्सुनपूर्व पावसाने पंढरपूर शहर व तालुक्यात हजेरी लावली आहे. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाल्याने फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर वेळेत पाऊस पडल्याने खरीपाच्या पेरणीचा वेग वाढणार आहे. शहर व तालुक्यात झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती.
जयंत पाटील यांची चौकशी सुरूच
मागील 8 तासांपासून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चौकशी सुरूच
दुपारी सव्वा बारा पासून जयंत पाटील ईडी कार्यालयात