G20 Kashmir Meeting: जी 20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक, श्रीनगरमध्ये तीन दिवसीय बैठकीच आयोजन
G20 Kashmir Meeting: भारतात आत्तापर्यंत 146 ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
G20 Kashmir Meeting: काश्मीरमध्ये आजपासून तीन दिवसीय जी-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चीन, तुर्की आणि सौदी अरब हे बैठकीत सहभागी होणार नाहीत. बैठकीत 25 देश सहभागी होतील अशी माहिती आहे. दुपारी 3 वाजल्यापासून बैठकीला सुरूवात होणार आहे.
श्रीनगरच्या डल लेकमध्ये असलेल्या शेर - ए- काश्मिर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये (SKICC) ही बैठक होणार आहे. या बैठकीत 25 देशातील 60 पेक्षा अधिक प्रतिनिधी तसेच जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यटन क्षेत्राशी जोडलेले लोक सहभागी होणार आहेत. जी20 च्या पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कडक बंदोबदस्त ठेवण्यात आला आहे. SKICC च्या दिशेने जाणारे दोन्ही रस्ते पुढील दोन दिवसांसाठी सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रतिनिधींची संख्या पाहता सुरक्षेच्या कारणास्तव गुलमर्गचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
OIC शी संबंधित अनेक देश सहभागी होणार
G20 चे को ऑर्डिनेटर हर्षवर्धन सिंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार काही देश बैठकीसाठी सहभागी नाही झाले तरी ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी बैठक होणार आहे. या बैठकीमुळे काश्मीरबाबतीत लोकांचा असणारा गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे. कारण य बैठकीत OIC शी संबंधित अनेक देश सहभागी होणार आहेत. जम्मू काश्मिर प्रशासनाने देखील या संधीचा फायदा घेत गेल्या काही वर्षात जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या विकासाची झलक प्रतिनिधींना दाखवली जाणार आहे. तसेच जम्मू काश्मिरच्या Rural Livelihood Mission अंतर्गत गेल्या तीन वर्षात काश्मिरच्या स्थानिक महिलांनी तयार केलेल्या सामानाचे देखील प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.
हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन
काश्मीर हँडक्राफ्टसाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर प्रशासनाने जी 20 बैठकीसाठी क्राफ्ट बाजारचे देखील आयोजन केले आहे. यामध्ये फक्त जम्मू काश्मीरमधील हँडीक्राफ्ट वस्तूंचे प्रदर्शन नाही ठेवले तर ती कशी बनवली जाते याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. शाल आणि कालीन बरोबरच MACHIE आणि तांब्याच्या वस्तूंचे देखील प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
G20 साठी आलेले पाहुणे सोमवारी सकाळी दिल्लीहून एका विशेष विमानाने काश्मीरला पोहचणार आहेत. त्यानंतर दिवसभर इको टूरिझम या विषयावर बैठक होणार आहे. 23 मे रोजी फिल्म टुरिझमवर बैठक होणार आहे. ही बैठक झाल्यनंतर शेवटच्या बैठकीसाठी व्हाईट पेपर तयार होईल ही बैठक वर्षाच्या अखेरीस होणार आहे. जी 20 चे अध्यक्षपद मिळाल्यानंतर भारतात आत्तापर्यंत 146 ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.