एक्स्प्लोर

विराटच्या शतकावर गिलचे शतक भारी, गुजरातचा आरसीबीवर सहा विकेटने विजय

शुभम गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केलाय.

RCB vs GT : शुभम गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केलाय. आरसीबीने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग गुजरातने पाच चेंडू आणि सहा विकेट राखून केला. विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ गेली. शुभमन गिल याने 52 चेंडूत 104 धावांची खेळी केली. आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. त्यामुळे मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.

गुजरातने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज वृद्धीमान साहा स्वस्तात तंबूत परतला. साहा याला फक्त 12 धावांचे योगदान देता आलेय. मोहम्मद सिराज याने साहाचा अडथळा दूर केला. साहा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 चेंडूत 123 धावांची भागिदारी केली. या जोडीने गुजरातच्या डावाचा पाया रचला.

शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सुरुवाताला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप घेत धावसंख्येला आकार दिला. विजय शंकर याने 35 चेंडूत 53 धावांची खेळी केली.  विजय शंकर याने बेंगलोरच्या मैदानावर तांडव घातला. विजय शंकर याने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. 

विजय शंकर बाद झाल्यानंतर गुजरातची फलंदाजी ढेपाळली. दासुन शनाका याला खातेही उघडता आले नाही. शनाका हर्षल पटेल याच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर विस्फोटक डेविड मिलर याचा अडथळा मोहम्मद सिराज याने दूर केला. मिलर याने सात चेंडूत सहा धावांची खेळी केली. 

शुभमन गिल याने एकाकी झुंज दिली. गिल याने 52 चेंडूत शतक झळकावले. गिल याने आठ षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 104 धावांची खेळी केली. आरसीबीकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. 

विराट कोहलीचे वादळी शतक, आरसीबीची 197 धावांपर्यंत मजल -

विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने 197 धावांपर्यंत मजल मारली आहे. विराट कोहलीने नाबाद 101 धावांची खेळी केली.  गुजरातकडून नूर अहमद याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. शमी आणि यश दयाल यांनीही एक एक विकेट घेतली.

विराट कोहलीचे शतक - 

विराट कोहली याने पहिल्या चेंडूपासूनच वादळी फलंदाजी केली. विराट कोहली याने सुरुवातीला संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने 13 चौकार आणि एक षटकार लगावला. विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने 197 धावांपर्यंत मजल मारली.  याने 166 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला.

विराट फाफची दमदार सुरुवात 

आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बेंगलोरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि सलामी फलंदाज फाप डु प्लेसिस यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी 67 धावांची सलामी दिली. नूर अहमद याने फाफला बाद करत ही जोडी फोडली. फाफ डु प्लेसिस याने 19 चेंडूत 28 धावांची खेळी केली. या खेळीत फाफने 5 चौकार लगावले. फाफ बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ग्लेन मॅक्सवेल 11 धावांवर बाद झाला. राशिद खान याने मॅक्सवेलचा अडथळा दूर केला. मॅक्सवेल याने एक षटकार आणि एक चौकार लगावला. महिपाल लोमरोर याला आज मोठी खेळी करता आली नाही. लोमरोर फक्त एका धावेवर लोमरोरच्या गोलंदाजीवर बाद झाला. लोमरोर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि ब्रेसवेल यांनी डाव सावरला. 

मायकल ब्रेसवेल आणि विराट कोहली यांनी आरसीबीच्या डावाला आकार दिला. चौथ्या विकेटसाठी या जोडीने 29 चेंडूत 47 धावांची भागिदारी केली. मोहम्मद शमी याने ब्रेसवेल याला बाद करत जोडी फोडली. ब्रेसवेल याने 16 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 26 धावांची खेळी केली. ब्रेसवेल बाद झाल्यानंतर कार्तिकही लगेच तंबूत परला. कार्तिकला खातेही उघडता आले नाही. यश दयाल याने दिनेश कार्तिक याला शून्यावर बाद केले.  त्यानंतर विराट कोहली आणि अनुज रावत यांनी आरसीबीचा डाव सावरला. 

विराट -अनुजने डाव सावरला -

विराट कोहली आणि अनुज रावत पाचव्या विकेटसाठी 34 चेंडूत 64 धावांची भागिदारी केली. यामध्ये रावतने 23 धावांचे योगदान दिले. विराट कोहलीने अखेरच्या 19 चेंडूत 40 धावांची खेळी केली. विराट कोहलीने याने दमदार शतकी खेळी केली. दरम्यान, गुजरातकडून नूर अहमद याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget