Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी
शनिवारच्या पाच तासांच्या चौकशीनंतर आज पुन्हा होणार समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी... वानखेडे यांना आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी सीबीआयच्या कार्यालयात बोलावलं... वानखेडे यांना सध्या कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिले आहे... समीर वानखडे यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे 22 मे रोजी उच्च न्यायालयात CBI आपला अहवाल सादर करणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस असून शासकीय विश्रामगृहावर सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ते शेतकरी संघटना, क्रेडाई संघटना, वास्तूविशारद संघटना आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
मुंबई भाजपची कार्यकारणी
राज्य कार्यकारिणी नंतर मुंबई भाजपची कार्यकारणी आयोजित करण्यात आली असून, मिशन 150 ची रणनिती यावेळी ठरणार आह सकाळी 10 वाजता दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मुंबई भाजपचे खासदार, आमदारांसह मुंबई भाजपची कोअर टीम बैठकीला उपस्थित रहाणार आहे
काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा
सोलापुरात आज काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची हजेरी... तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा... सोलापुरात काँग्रेस तर्फे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या निर्धार मेळाव्यास काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची हजेरी पाहायला मिळणार आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर निर्धार मेळावा होणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर दौऱ्यावर आहेत... महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशनासाठी ते उपस्थिती लावतील... सकाळी 10 वाजता पोलीस परेड ग्राऊंडवर हेलिकॉप्टरने त्यांचं आगमन होईल, त्यानंतर मार्केट यार्ड परिसरात माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल त्यानंतर महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन होईल... यावेळी शरद पवार यांच्यासह धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार आहेत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याचा आज दुसरा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याचा आज दुसरा दिवस... मोदी आज हिरोशिमातील पीस मेमोरियला जातील... ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत द्विपक्षिय चर्चा करणार आहेत... त्यानंतर जी 7 बैठकीत भाग घेतील... भारतीय वेळेनुसार पहाटे 4.30 वाजता मोदींचे कार्यक्रम सुरू होतील... भारतीय वेळेनुसार मोदी आणी ऋषी सुनक यांची भेट सकाळी 5.50 ते 6.20 वाजेपर्यंत होईल..
भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी
भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी... 21 मे 1991 ला तमिळनाडूत प्रचार सभेदरम्यान बॉंम्बने उडवून त्यांची हत्या केली होती... राजीव गांधी यांचं समाधी स्थळ वीर भुमी या ठिकाणी सकाळी 7.30 वाजता एका कार्यक्रमाच आयोजन केले आहे... या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतरही नेते उपस्थित असणार आहेत
Nanded News:नांदेड: व्याजाच्या पैश्यासाठी तगादा लावल्याने एकाने विष पिऊन जीवन संपवले
Nanded News: व्याजाच्या पैश्यासाठी तगादा लावल्याने एकाने विष पिऊन आत्महत्या केली. नांदेड जिल्हयातील मुदखेड येथे ही घटना घडली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकानी मृतदेह मुदखेड पोलीस ठाण्यात आणून ठेवला. तब्बल तीन तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा येथील सचिन पाकलवाड यांनी दोघांकडून व्याजाने एक लाख रूपये घेतले होते. व्याज आणि मुद्दलच्या नागेश वाघमारे आणि साहेबराव चौदंते यांनी तगादा लावला. त्याला कंटाळून सचिन पाकलवाड यांनी दोन दिवसापूर्वी विष प्राशन केले. त्यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
Ahmednagar News: अहमदनगर: केडगाव परिसरात खाद्य तेलाच्या कंपनीला भीषण आग
Ahmednagar News: अहमदनगरच्या केडगाव परिसरातील साईराज इंडस्ट्री या खाद्यतेल बनविणाऱ्या कंपनीला सायंकाळी 6 वाजता भीषण आग लागल्याची घडना घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जवळपास तासभर सुरू असलेल्या आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असून आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
Pune News: सासवड मधील सामुदायिक विवाह सोहळ्यास अजित पवारांची उपस्थिती
Pune News: पुरंदरमधील आदर्श क्रांती संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यास विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी नवविवाहित दाम्पत्यांना आशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्यात 24 जोडप्याचा विवाह झाला. एका दिव्यांग जोडप्याची अजित पवारांनी विशेष चौकशी केली. आदर्श क्रांती संघटनेच्यावतीने पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात 24 जोडप्यांचा विवाह करण्यात आला. यावेळी विरोधी पक्ष अजित पवारांनी हजेरी लावत नवविवाहितांना शुभाशीर्वाद दिले. पुरंदर मधील आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने गेली सतरा वर्ष सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या विवाह सोहळ्याला दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हजेरी लावली होती.
Beed News: बीड: माजलगावच्या केसापूर येथे असलेल्या चालुक्य काळात बांधलेल्या मंदिराचं होणार जतन
Beed News: माजलगाव येथील केसापुरी येथे चालुक्य काळात बांधण्यात आलेल्या मंदिराची पुरातत्त्व विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून या मंदिराच्या पुनर्नमानाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.. केसापुरी येथे असलेल्या पुरातन वास्तूकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे त्यामुळे गावकऱ्यांनी पुरातत्व विभागाकडे या वास्तूची दुरुस्ती करण्यासाठी मागणी केली होती आणि त्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वास्तूची पाहणी केली असून या ठिकाणच्या शिल्पसौंदर्याचा जतन करण्यासाठी मंदिराच्या पुनर्निर्मानाचे काम करण्यात येणार आहे यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या मंदिरावर कोरलेल्या विविध शिल्पाच देखील जतन करण्यात येणार आहे
Beed News: बीड: गढी-माजलगाव रोडवर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Beed News: माजलगाव गढी रोडवर एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा विचित्र होता की अपघातानंतर या तरुणाचा मृतदेह गाडीवर बसलेल्या ठिकाणीच अडकून राहिला होता. किसन खरात असा अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.