Maharashtra Live Updates : Mumbai Goa : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळली . सर्वोच्च न्यायालयाने फेटाळी याचिका
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
20th April Headlines: आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज घडणारी खगोलीय घटनादेखील महत्त्वाची आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज सकाळी 07.04 ते 12.29 पर्यंत होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. राज्यातील कृषी बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीसाठी आज शेवटचा दिवस आहे. राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
सूरत, गुजरात
- 2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार? आज कोर्टाचा यावर निर्यण येण्याची शक्यता आहे.
मुंबई -
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सह्याद्री अतिथीगृह भेट घेणार आहेत. वरळी बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पात काही मागण्या घेऊन मनसेचे कार्यकर्ते आणि रहिवाश्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती त्यानंतर आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट होणार आहे.
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेली जीवित आणि वित्त हानी यासंदर्भात संभाजी ब्रिगेड पोलिसात तक्रार अर्ज देत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार आहेत.
- कथित एसआरए घोटाळा प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. तूर्तास पेडणेकरांना हायकोर्टानं दिलाय अटकेपासून दिलासा.
- हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. साजिद, आबीद आणि नाविद यांना ईडीच्या प्रकरणात अटकेपासून दिलेलं संरक्षणही आज संपणार आहे.
- कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज छगन भुजबळांसह सर्व 52 आरोपी मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याची शक्यता. सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकांवर होणार सुनावणी.
- सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आज मुलुंड कोर्टात होणार का हजर? मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयानं जावेद अख्तर यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघा विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे.
नाशिक
- नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे कुठे निवडणूक बिनविरोध होणार कुठे चुरशीची निवडणूक होणार हे आज स्पष्ट होणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना भाजप विरोधात महाविकास आघाडी अशी लढत आहे तर पिंपळगाव मध्ये महाविकास आघाडीचे 2 प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटचे माजी आमदार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यांच्यात लढत आहे.
नागपूर
- ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची खारपान पट्ट्यातील पाणी समस्येसाठी काढलेली पैदल संघर्ष यात्रा आज नागपूरला पोहचणार आहे. 10 एप्रिल अकोल्याच्या राजराजेश्वर मंदिरपासून हि यात्रा सुरु झाली होती. आज नागपुरात दाखल झाल्यावर उद्या अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरपेठ येथील घरासमोर यात्रा जाऊन ते तेथे आंदोलन करणार आहे. नागपूर पोलिसांनी त्यांना आंदोलनाचे स्थळ बदलावे यासाठी नोटीस बजावली आहे.
पुणे
- पुणे जिल्ह्यातील रांजनगाव एमआयडीसी मध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यात येईल असे राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात जाहीर केले. गुरुवारी उद्योगमंत्री उदय सामंत रांजनगाव एमआयडीसी मध्ये येऊन याबाबत आढावा बैठक घेणार आहेत.
Maratha Reservation : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळली . सर्वोच्च न्यायालयाने फेटाळी याचिका
Maratha Reservation : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण लांबणीवर गेले आहे.
Pune Rain : भर उन्हात पुण्यात पावसाला सुरुवात; काही भागात गारपीट
Pune Rain : पुण्यात भर उन्हात पावसाला सुरुवात झाली आहे. दिवसभर कडक उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते. हवामान खात्याने आज तीन तास पाऊस पडणार असल्याची शक्यता दर्शवली होती. पुण्यातील कोथरुड परिसरात सोसाट्याचा वारा आला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यासोबतच वारजे परिसरात सुसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होत आहे.
नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर, 15 हून अधिक व्यावसायिकांवर छापेमारी
Nashik : नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर, शहरातील 15 हुन अधिक व्यावसायिकावर छापा पडल्याची माहिती आहे. शहरात 50 हुन अधिक अधिकारी व्यावसायिकांच्या कार्यालयावर घरी तपासणी करत आहेत. अचानक एकाच वेळी पडलेल्या छापमारी ने बाधकाम व्यवसायिकाचे धाबे दणाणले असून सर्व हिशेब तपासले जात असून कर चुकवेगिरी केलीं आहे की नाही याचा तपास केला जात असून चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागलं आहे. नागपूर छत्रपती संभाजी नगर , नाशिक आशा विविध टिमच्या माध्यमातून तपासणी केलींजात असून 50 ते 60 वाहनांमधून अधिकारी शहरात दाखल झाले आहेत.
CoronaVirus News: राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती
CoronaVirus News वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनंतर अखेर सरकारला जाग आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे मास्क लावून काम करण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत.
Kalyan News: 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी सर्व पक्षीय संघर्ष समितीचे आंदोलन
Kalyan News: कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेला सत्तावीस गावांमधील विविध समस्यांबाबत आज सर्व पक्षीय संघर्ष समितीने महापालिका मुख्यालयावर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. 27 गावांमध्ये मालमत्ता करात वाढ केली आहे. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करणे ,ग्रोथ सेंटर रद्द करणे ,भाल ,भोपर गावातील डम्पिंग ग्राउंड रद्द करणे, ,आरोग्य व शिक्षण व्यवस्था सदृढ करणे अशा मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले .यावेळी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीने दिला.