Mumbai-Madgaon Vande Bharat Express: मुंबई-गोवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम रद्द; ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Jun 2023 11:35 PM
Naxal Attack: नक्षलवादी पोलिसांविरोधात पुलवामा हल्ल्यासारखा घातक हल्ला करण्याच्या तयारीत? जहाल नक्षलवाद्याचा चौकशीत गौप्यस्फोट
Maoist Naxal latest News: पोलीस आणि नक्षलविरोधात विशेष दलावर पुलवामा सारखा हल्ला करण्याच्या प्रयत्नात नक्षलवादी आहेत, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. Read More
Mumbai-Madgaon Vande Bharat Express: मुंबई-गोवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम रद्द; ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Mumbai-Goa Vande Bharat Express:  ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातामुळे शनिवारी होणारा मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. Read More
Maharashtra IAS Officer Transfer: राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली
IAS Officer Transfer:  राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तुकाराम मुंडे यांचीही बदली करण्यात आली आहे. Read More
उच्चभ्रू वसाहतीत ग्रीन नेट शेडमध्ये सुरु होता जुगार अड्डा, पोलिसांना टीप मिळाली अन् गेम बसला
Chhatrapati Sambhaji Nagar : दरम्यान या कारवाईत 20 आरोपीच्या ताब्यातून 31 लाख 88 हजार 627 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  Read More
Dr. Tatyarao Lahane: जेजे रुग्णालय आणि आमचा संबंध संपला; डॉ. लहाने यांचे उद्गविन उद्गार
Dr. Tatyarao Lahane J J Hospital: जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने यांनी आजपासून आपला आणि जेजे रुग्णालयाशी संबंध संपला असल्याचे जाहीर केले. Read More
Beed Crime News: पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Beed Crime News: पुतणीवर अत्याचार करणाऱ्या एका चुलत्याला अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयानं दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. चार वर्षांपूर्वी चुलत्यानेच आपल्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टामध्ये सुरू होतं आणि याच प्रकरणात अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

India Richest Actress: दीपिका, आलिया नाही तर 'ही' आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री; संपत्तीबाबत जाणून घ्या...
भारतातील टॉप-10  श्रीमंत अभिनेत्री कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊयात भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या संपत्तीबाबत... Read More
Election : वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत मुंडे भगिनींसह 21 उमेदवार बिनविरोध
Sugar Factory Election in Beed : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. Read More
WMO: IMD संचालक मृत्युंजय महापात्रा यांची जागतिक हवामान संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
Mrityunjay Mohapatra News: IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांना मोठं यश मिळालं आहे. त्यांची WMO च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
2nd June in History: तेलंगणा भारताचे 29वे राज्य झाले, दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म आणि दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन; आज इतिहासात
2nd June in History: सामाजिक आणि दैनंदिन जीवनात 2 जून या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. आजच्या दिवशी तेलंगणा भारताचे 29वे राज्य झाले, यासह इतर महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


Rules Changing From 1 June 2023: आजपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम


Rules Changing From 1 June 2023: आजपासून नवा महिना सुरू होत आहे. अशातच जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतींत बदल करतात. यासोबतच पीएनजी (PNG) आणि सीएनजीच्या (CNG) किमतीही बदलल्या जाऊ शकतात. यामुळे या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. जाणून घेऊयात आजपासून बदलणार असलेल्या नियमांबद्दल... 


1. गॅस सिलेंडर, CNG आणि PNG च्या किमतींत बदल 


तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी (LPG), सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किमती बदलतात. गेल्या दोन महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर एप्रिल आणि मे महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. जूनमध्ये तेल कंपन्या गॅसच्या किमतींत काही बदल करू शकतात.


2. 100 दिवस 100 पेमेंट मोहीमेला सुरुवात 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अनक्लेम्ड रक्कम परत करण्यासाठी 100 दिवस 100 पेमेंट मोहीम सुरू केली आहे. याद्वारे RBI नं बँकांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेतील किमान 100 अनक्लेम्ड डिपॉजिट ठेवी ग्राहकांना 100 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. याद्वारे आरबीआय इनअॅक्टिव आणि अनक्लेम्ड रकमेची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. 


3. इलेक्ट्रिक टू व्हीलर महागणार


जर तुम्ही या महिन्यात इलेक्ट्रिक टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाप बसणार आहे. 1 जूनपासून इलेक्ट्रिक स्कूटर्स महाग होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयानं 21 मे 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली होती की, सरकार आता या वाहनांवरील अनुदान कमी करणार आहे. यापूर्वी या वाहनांवर 15,000 रुपये प्रति किलोवॅट अनुदान उपलब्ध होतं, ते आता 10,000 रुपये करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, जून 2023 पासून, या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा खर्च 25,000 ते 30,000 रुपयांनी महाग होणार आहे.


LPG Gas Cylinder Price: LPG गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त, पाहा Latest Rates


LPG Cylinder Price Reduce: एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) मोठी घट झाली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर (Cylinder Price) पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता.


नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1773 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. 1 जूनपासून, बदललेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 1773 रुपयांना विकला जात आहे. आणि 1 जून रोजी कोलकातामध्ये 1875.50 रुपयांना मिळत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.