उच्चभ्रू वसाहतीत ग्रीन नेट शेडमध्ये सुरु होता जुगार अड्डा, पोलिसांना टीप मिळाली अन् गेम बसला
Chhatrapati Sambhaji Nagar : दरम्यान या कारवाईत 20 आरोपीच्या ताब्यातून 31 लाख 88 हजार 627 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) गंगापूर तालुक्यात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईनंतर आता ग्रामीण पोलिसांनी आणखी एका जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. वैजापूर- रोटेगाव रोडवरील अमर हॉटेलच्या पाठीमागील आनंद नगरमधील उच्चभ्रू लोक वसाहतीच्या मध्यभागी हा जुगार अड्डा सुरु होता. दरम्यान याबाबत सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांना टीप मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईत 20 आरोपीच्या ताब्यातून 31 लाख 88 हजार 627 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबत सक्त भूमिका घेत अवैध धंदे चालवणाऱ्यांवर धडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांना गुरुवारी (1 मे) रोजी गोपनीय माहिती मिळाली की, वैजापूर - रोटेगाव रोडवरिल अमर हॉटेलच्या पाठीमागील आनंदनगर मधील उच्चभ्रू लोक वसाहतीच्या मध्यभागी असलेल्या चंद्रपाल राजपुत याचे घराशेजारील मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरु आहे. एका ग्रीन नेटचे शेड टाकून यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याचे बाहेरील व्यक्ती सहभागी होवून पत्याचा तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
महक स्वामी यांनी पोलीसांची तीन पथके तयार करून अत्यंत गोपनीय पद्धतीने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहचल्या. तसेच पथकांना कारवाईच्या अनुषंगाने सूचना देऊन परिसरात घेराव घालून सापळा लावला. दरम्यान यावेळी पोलीसांची रेकी करण्यासाठी काही अंतरावर एक व्यक्ती ठेवण्यात आला होता. जेणेकरून पोलिसांची चाहुल लागताच जुगारींना माहिती पोहचवली जाईल. त्यामुळे पेालीसांनी वेगवेगळी पथके तयार करून या संपूर्ण परिसराची बारकाईने व छुप्या पद्धतीने पाहणी व पडताळणी केली. तसेच सापळा लावून छापा मारण्याचे नियोजन केले. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठया प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केलेली दिसून आल्याने पोलिसांना जुगार अड्डा सुरु असल्याची खात्री पटली.
अचानक झालेल्या कारवाईने जुगाऱ्यांची धांदल उडाली
पोलिसांच्या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन लांबून पाहणी केली असता, मोकळ्या जागेतील ग्रीन नेट शेड मध्ये काही लोक पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळतांना दिसून आले. यावरुन पथकांनी अचानक घेराव टाकून छापा टाकला. पोलिसांकडून अचानक करण्यात आलेल्या कारवाईने जुगाऱ्यांची धांदल उडाली. त्यामुळे मिळेल त्या रस्त्याने ते सैरावैर पळत सुटले. परंतु तरीही पोलीसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत खालील 20 जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर या कारवाईत रोख 79 हजार 637 रुपयांसह 04 चारचाकी वाहने, 14 दुचाकी वाहने, 16 मोबाईल फोन, 57 पत्ताचे कॅट, 45 प्लॅस्टिकचे कॉईन इतर जुगाराचे साहित्य असे एकुण 38 लाख 88 हजार 627 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांच्यावर कारवाई...
1) ऋषिकेश संजय राऊत वय 25 वर्षे रा. लाडवाणी, वैजापुर 2) अफरोज शेख जब्बार वय 41 वर्षे रा. नांदगाव रोड, येवला, 3) सुनिल हरिभाऊ गिरी वय 48 वर्षे रा. वैजापुर 4) शेषराव विठ्ठल नवले वय 48 वर्षे रा. खोपडी ता. कोपरगाव 5) शकील शरीफ पठाण वय 48 वर्षे रा. वैजापुर 6) मनोहर ताराचंद घोलप वय 30 वर्षे रा. मनमाड ता. नांदगाव 7) राजु रुपचंद शिंदे वय 45 वर्षे रा. राहुरी ता. राहुरी. 8) रवि मच्छींद्र मुळे वय 29 वर्षे रा. वैजापुर 9) कैलास नारायन लुटे वय 56 वर्षे रा. कोल्हार ता. राहता 10) चंद्रपाल भगतसिंग राजपुत वय 42 वर्षे रा. वैजापुर 11) शेख फय्याज शेख शेख गनी वय 36 वर्षे रा. वैजापुर 12) बाबासाहेब लक्ष्मण गायकवाड वय38 वर्षे वैजापुर 13) अशोक बापुराव टिळेकर वय 39 वर्षे रा. वैजापुर 14)सुनिल बाळासाहेब लोटके वय 45 वर्षे रा.श्रीरामपुर जि.अ.नगर 15) हितेश गोपालदास रामैय्या वय 36 वर्षे रा. वैजापर 16) दयानंद रतन जावळे वय 52 वर्षे रा.येवला 17) संतोष शामराव पवार वय43 रा. राहुरी ता. राहुरी 18) निलेश गोपीनाथ लोंढे वय 33 वर्षे रा.येवला 19) दिपक रमेश इंगळे वय 50 वर्षे रा. राहुरी ता. राहुरी 20) संजु कचरू जाधव वय 45 रा. महालगाव ता. वैजापुर असे मिळुन आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: