2nd June in History: तेलंगणा भारताचे 29वे राज्य झाले, दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म आणि दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन; आज इतिहासात
2nd June in History: सामाजिक आणि दैनंदिन जीवनात 2 जून या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. आजच्या दिवशी तेलंगणा भारताचे 29वे राज्य झाले, यासह इतर महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या.
2nd June in History: जून महिना सुरु झाला आहे आणि इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी तेलंगणा भारताचे 29वे राज्य झाले. आजच्याच दिवशी प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन झालं होतं. तर, चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म झाला.
1953: इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.
आजच्याच दिवशी इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखांचा राज्याभिषेक समारंभ प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे जगभर पाहिला गेला होता. एलिझाबेथ या सर्वात जास्त काळ जगलेल्या ब्रिटीश सम्राज्ञी होत्या. 8 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
1955 : चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म.
दाक्षिणात्य मनोरंजन विश्वापासून ते बॉलिवूडपर्यंत, आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मणिरत्नम यांचा आज जन्मदिन आहे. दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथाकार असलेले मणिरत्नम यांनी एकापेक्षा एक सरस हिट चित्रपट दिले आहे. बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवत त्यांनी गुरु, युवा यांसारख्या दखल घेण्याजोग्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
1988 : भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन.
राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक होते. 2 जून 1988 रोजी त्यांचे निधन झाले. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ शम्मी कपूर आणि शशी कपूर हेही चित्रपट अभिनेते होते. त्यांना बॉलीवूडमधील शोमॅन म्हणून ओळखले जाते. राज कपूर यांना 1987 साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील राजबाग (लोणी काळभोर) येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक आहे.
2014 : तेलंगणा भारताचे 29वे राज्य झाले.
तेलंगणा भारताचे 29 वे राज्य असून 2 जून 2014 रोजी त्याची स्थापन झाली. हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती. तेलंगणा भौगोलिकदृष्ठ्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे.
इतर महत्त्वाच्या घटना:
1800 : कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
1862: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलीफ़ोनचा शोध लावला.
1896 : गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी 'रेडिओ'चे पेटंट घेतले.
1955: इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म.
आजचे जागतिक दिवस:
इटलीचा प्रजासत्ताक दिवस (Republic Day in Italy)
आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन (International Sex Workers Day)
अमेरिकन भारतीय नागरिकत्व दिन (American Indian Citizenship Day)