एक्स्प्लोर

Mumbai-Madgaon Vande Bharat Express: मुंबई-गोवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम रद्द; ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Mumbai-Goa Vande Bharat Express:  ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातामुळे शनिवारी होणारा मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

Mumbai-Madgaon Vande Bharat Express:  मुंबई-मडगाव (Mumbai Goa Vande Bharat Express) दरम्यान धावणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा (Vande Bharat Express) शनिवारी होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या (Odisha Railway Accident) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्याची पहिली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. मुंबई-मडगाव ही भारतातील 19 वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. मुंबई ते मडगाव हे अंतर वंदे भारत एक्स्प्रेस सात तास 50 मिनिटात पूर्ण करणार आहे.

वंदे भारत ट्रेनची वेळ आणि थांबे 

मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याला सहा दिवस चालवण्याचं सध्या प्लॅनिंग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मडगाव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकांवर वंदे भारत ट्रेन थांबेल. सध्या दिलेल्या प्रस्तावानुसार, सीएसएमटी वरून सकाळी 5.35 ला ट्रेन सुटेल, तर मडगाव येथे दुपारी 1.15 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचेल. त्यानंतर लगेच मडगाव वरुन तीच वंदे भारत दुपारी 2.35 वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री 10.25  वाजता ट्रेन मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस ही कोकण मार्गावर धावणारी सर्वात जलद एक्सप्रेस असणार आहे. तेजस एक्सप्रेसपेक्षा देखील एक तास लवकर ही ट्रेन मडगावला पोहोचेल, त्यामुळे या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. 

ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात, 50 ठार

ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromondel Express) आणि  मालगाडी यांचा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला (Coromondel Express Accident) धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार 132  प्रवासी जखमी झाले असून 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.  

अपघात कशामुळे झाला?

कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे म्हटले जात आहे. 

मात्र, अद्याप या अपघाताबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडा मार्गे ओडिशा पर्यंत धावते.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget