Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या उद्धाटन मुहूर्त लांबला, महामार्गावरील कामं रखडल्याने निर्णय
Maharashtra News : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण 2 मे रोजी करण्याचे नियोजित होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार ते तयारीही सुरू केली होती.
नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (,samruddhi highway) पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात प्रमाणे हा उद्घाटन सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी वन्यजीव उन्नत मार्ग म्हणजे वाईल्ड लाईफ ओव्हरपास बनवण्यात आले आहे. मात्र एका ठिकाणी आर्च पद्धतीचा ओव्हरपास अपघातामुळे क्षतिग्रस्त झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव ते 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. तसेच तज्ज्ञांनी आता वन्यजीव उन्नत मार्गासाठी नव्या पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचे सुचविले आहे. त्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर ते सेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा किमान दीड ते दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण 2 मे रोजी करण्याचे नियोजित होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार ते तयारीही सुरू केली होती. नुकतेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेलुबाजार ते वर्धा जिल्ह्यापर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणीही केली होती.
समृद्धी महामार्गामुळे किती तासांत कुठे पोहचणार?
- मुंबई ते नागपूर हा प्रवास 8 तासांचा असेल
- मुंबई ते औरंगाबाद अवध्या 4 तासांचा असेल
- औरंगाबाद ते नागपूरही 4 तासांचा असेल
- नागपूर ते शिर्डीचा प्रवासही 5 तासांचा असेल
संबंधित बातम्या :