एक्स्प्लोर

Government Employees Strike : मराठवाडा विभागातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटिसा

Government Employees Strike मराठवाडा विभागातील (Marathwada Division) सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आली आहे. 

Government Employees Strike Update: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील वेगवेगळ्या विभागाचे शासकीय कर्मचारी संपावर (Government Employees Strike) गेले असून, संपाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्याचे जाहीर केले असून, संप मागे घेण्याचं आवाहन केले होते. मात्र असे असताना कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस (Notice) पाठवायला सुरुवात केली आहे. दरम्यान मराठवाडा विभागातील (Marathwada Division) सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. 

संपावर (Strike) गेलेल्या मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीची नोटीस देण्यात आले आहे. त्यामुळे आता संपाबाबत प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच 'काम नाहीतर वेतनही नाही, या धोरणाचा अवलंब शासनाने केल्याचेही नोटीसमधून सांगण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील वेगवेगळ्या 78 विभागांतील 23 हजार 622 पैकी 8 हजार 722 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तसेच 14 हजार 596 कर्मचारी कामावर हजर आहे. तर मराठवाडा विभागातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूरमधील महापालिका वगळून सुमारे 80 हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे विभागात वेगवेगळ्या विभागातील 54 हजार 171 कर्मचारी  संपावर असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण सव्वालाख कर्मचारी संपावर गेले आहेत. 

चौथ्या दिवशीही संप सुरुच...

जुन्या पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यासह राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी (Government Employees) संपाची हाक दिली. त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर होऊ लागला आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी देखील संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. तर अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कोलमडले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज चौथ्या दिवशी देखील संप कायम असून, कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. 

संपकरी आकडेवारी...

अ.क्र. जिल्हा (कार्यालयाचे ठिकाण) संपकऱ्यांची संख्या 
1 विभागीय आयुक्तालय  21
2 छत्रपती संभाजीनगर  7,738
3 जालना  4,536
4 परभणी  5,251
5 हिंगोली  3,982
6 नांदेड  10,764
7 बीड  7,430
8 धाराशिव  5,626
9 लातूर  7,826
  एकूण  54,171

इतर महत्वाच्या बातम्या : 

Government Employees Strike: अखेर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले...
कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले...
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
Manoj Jarange: या विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
या विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
Onion Export Duty: कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा  लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal on Onion : कांदा प्रश्नावरून भुजबळ विधानसभेत आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांनी कांदाप्रश्न केंद्रांसमोर मांडावाABP Majha Marathi News Headlines 12.00 PM TOP Headlines 12.00 PM 10 March 2025Manoj Jarange PC | धनंजय मुंडेंना फडणवीस वाचवताय, पण हा साप... जरांगेंची स्फोटक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 11.00 AM TOP Headlines 11.00 AM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले...
कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले...
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
Manoj Jarange: या विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
या विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
Onion Export Duty: कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा  लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
Canada PM Mark Carney : मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
Beed Crime : चोर सोडून संन्याशाला फाशी! खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल
चोर सोडून संन्याशाला फाशी! खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच गुन्हा दाखल
शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार? नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता, वर्षभरात खात्यात किती रुपये येणार?
शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार? नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता, वर्षभरात खात्यात किती रुपये येणार?
Lalit Modi : तालुक्याएवढ्या देशात ललित मोदीने नागरिकता घेतली, पण तेथील पंतप्रधानांनी दिला तगडा झटका! ना घर का, ना घाट का अशी झाली अवस्था
तालुक्याएवढ्या देशात ललित मोदीने नागरिकता घेतली, पण तेथील पंतप्रधानांनी दिला तगडा झटका! ना घर का, ना घाट का अशी झाली अवस्था
Embed widget