माजी मुख्यमंत्र्यांचा मैत्रीचा धागा, चहाच्या कपाने गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ जोडलेला ऋणानुबंध आजही कायम
कुलदैवताला नेहमीच येत असल्यानं फडणवीसांचा परिचय मंदिरासमोर हॉटेल चालवणाऱ्या दशरथ राऊत यांच्याशी झाला. तेव्हापासून आजतागायत फडणवीस आणि राऊत यांच्यात एक प्रकारे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय.
इंदापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नीरा नरसिंहपूर हे कुलदैवत आहे. दरवर्षी वेळेचे गणित घालत फडणवीस येथे कुलदैवताच्या चरणी येत असतात. मात्र नीरा नरसिंहपूर येथे देवाच्या दर्शनानंतर ते थेट पोहचतात आपल्या मित्राच्या चहा टपरीवर आणि मग चहाचा कप घेतल्यावर ते पुढच्या दौऱ्याला निघतात.
सत्तेचा डामडौल कायम नसतो पदे येतात जातात मात्र मैत्रीचे नाते कायम टिकते. मैत्रीमध्ये गरिब-श्रीमंत, उच्च-कनिष्ठ असा भेद नसतो. कृष्णा-सुदामापासून मैत्रीचे किस्से आपण ऐकत असतो, अशीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरा नरसिंहपूर येथील चहावाल्याची मैत्री इंदापूर आणि बारामती परिसरातील चर्चेचा विषय आहे. त्यामुळंच माजी मुख्यमंत्री न चुकता या चहावाल्याचा चहा प्यायल्याशिवाय जात नाहीत. देवेंद्र फडणवीस हे नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेलं व्यक्तिमत्व आहे. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी विविध पदे भूषवली. आज ते राज्याचे विरोधी पक्ष नेता आहेत. मात्र त्यांचे जुन्या काळापासून असलेले ऋणानुबंध आजही कायम असल्याचं दिसतं.
इंदापूर तालुक्यातल्या नीरा नरसिंहपूर या गावी असलेलं श्री लक्ष्मी नृसिंह हे फडणवीस कुटुंबियांचं कुलदैवत आहे. वर्षातून एकदा तरी फडणवीस कुटुंबिय या मंदिरात दर्शनासाठी येतात. फडणवीस यांनी आज इंदापूर तालुक्यातील नरसिंहपुर येथे आपल्या कुलदैवताची पुजा केली. या पूजेनंतर फडणवीस मंदिरातून बाहेर जात असताना फडणवीस राऊत यांच्या टपरीवजा हॉटेलात चहाचा आस्वाद घेतला. कुलदैवताला नेहमीच येत असल्यानं फडणवीसांचा परिचय मंदिरासमोर हॉटेल चालवणाऱ्या दशरथ राऊत यांच्याशी झाला. तेव्हापासून आजतागायत फडणवीस आणि राऊत यांच्यात एक प्रकारे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. त्यामुळंच देवेंद्र फडणवीस हे आज विरोधी पक्ष नेता पदावर असतानाही राऊत यांचा चहाच्या टपरीवर सोडलेलं नाही. यातूनच मुख्यमंत्र्यांनी जपलेल्या मैत्रीची प्रचिती येते.
संबंधित बातम्या :
Devendra Fadnavis : शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळलीय का?, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : सदाभाऊ खोतांच्या 'जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा' या अभियानाचा आज समारोप, देवेंद्र फडणवीसांची टेंभुर्णीत सभा