एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राज्यातील धरणे पावसाविना कोरडीठाक, सप्टेंबर उजाडला उजनी धरणात 16 टक्के तर जायकवाडी धरणात 34 टक्के पाणीसाठा

पाणीसंकट गडद होत असल्याने विविध शहरांमध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे. राज्यात  गेल्या वर्षी या वेळी 84.84  टक्के जलसाठा  होता.

मुंबई : जून सरला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वच विभागातील धरणं तळ (Water Crisis) गाठू लागली आहेत. त्यामुळे राज्यातील (Maharashtra News) पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील  धरणातील साठा 64.75 टक्के आहे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. पाणीसंकट गडद होत असल्याने विविध शहरांमध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे. राज्यात  गेल्या वर्षी या वेळी 84.84  टक्के जलसाठा  होता. पुढील एक आठवडा राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा

राज्यातील (Maharashtra) पिण्याची पाण्याची (Water) वणवण सुरुच आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आधीच असलेली तूट आणि वाढत जात असलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणसाठे मागच्या वर्षीची सरासरी देखील गाठतील की नाही अशी चिंता आहे.  राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे.  राज्यात मागच्या वर्षी  सप्टेंबर महिन्यात 16 धरणं  काठोकाठ भरली होती. 

मराठवाड्यातील पाणीस्थिती गंभीर, उजनी धरणात यंदा फक्त 17.54  टक्के पाणी

पावसाचा जोर कमी असल्याने राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये पाणीस्थिती गंभीर बनली असून उजनी धरणात यंदा फक्त 17.54  टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.  मागील वर्षी याचवेळी उजनी धरण 100 टक्के भरलं होते. मराठवाड्यातील जलसाठ्यांची गंभीर स्थिती आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीत यंदा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी जायकवाडीत 94 टक्के पाणीसाठा होता आहे. लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यांची गंभीर परिस्थिती आहे. भुसानी सोडता एकाही जलसाठ्यात 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा नाही.  भुसानीत आज 52.35  टक्के पाणीसाठा  आहे.  हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी सिध्देश्वर आणि येल्दारी धरणात 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. मात्र यंदा सिध्देश्वर धरणात 46 टक्के तर येलदारीत 60 टक्के पाणीसाठा  शिल्लक आहे. 

विदर्भात धरणांमध्ये पाणीसाठा कमी

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व विभागांतील धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. विदर्भातील धरणांमध्ये सरासरी पाणीसाठा आहे. परिस्थिती गंभीर नसली तरी पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. बुलढाण्यात मात्र यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह आहे. खडकपूर्णा धरणात फक्त चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  मागच्या वर्षी खडकपूर्णा धरणात 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.  नळगंगा धरणात 26 टक्के पाणीसाठा तर पेनटाकळीत 49  टक्के जलसाठा शिल्लक आहे. 

हे ही वाचा :

Nashik Drought : 'देवा, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस पडू दे, पालकमंत्री दादा भुसे यांची प्रार्थना', केवळ 380 मिमी पावसाची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget