Sanjay Raut : काँग्रेसनं सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी
देशभरात आम्ही 305 जागा जिंकू आणि महाराष्ट्रात 35 प्लस जागा जिंकू. मुख्यमंत्र्यांनी रोडशो घेऊ दे नाही तर काही करु दे त्यांच्या हातात काही पडणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
सांगली : सांगलीमध्ये (Sangli ) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. सांगलीच्या जागेवर सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी (Vishal Patil) अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केलाय. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसनं सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी काँग्रेसकडे केली आहे. ते नागपुरात बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, पक्षात कुणी बंडखोरी करून निवडणूक लढवत असेल, तर कारवाई केली पाहिजे. जर एखाद्या पक्षचा नेता शिस्तभंग करत असेल तर पक्षाने त्याची हकालपट्टी करावी. सांगलीत कुणाची ताकत किती आहे, हे लोक ठरवते, जर सांगलीत आमचा विजय होईल.
फडणवीसांना आकडे लावण्याची सवय, निवडणुकीनंतर हेच करावं लागेल: संजय राऊत
देशभरात आम्ही 305 जागा जिंकू. महाराष्ट्रात 35 प्लस जागा जिंकू. मुख्यमंत्र्यांनी रोड शो घेऊ दे नाही तर काही करु दे त्यांच्या हातात काही पडणार नाही. निवडणुकीला हळूहळू रंग चढत जाईल, जे सर्व्हे येत आहेत, त्याबाबद्दल आम्ही सहमत नाही. आम्हाला महाराष्ट्र शंभर टक्के यश मिळेल. देवेंद्र फडणवीस जे सांगत आहेत 45 प्लस त्याचे आकडे काहीही असू द्या त्यांना आकडे लावण्याची सवय आहे. निवडणुकीनंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी कली आहे.
देशभरात आम्ही 305 जागा जिंकू: संजय राऊत
महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल, महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 35+ आणि देशात 305 जागा मिळतील. पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नाहीत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कुणी काहीही म्हणू द्या, कितीही सर्व्हे येऊ द्या परिवर्तनांची सुरूवात ही विदर्भातुन होते. लोक पक्ष नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार बघत आहेत. रामटेकमध्ये आमचा उमेदवार नाही पण महाविकास आघाडीसाठी मी बैठक घेत आहे.
मुंबईत भाजपने एक तरी जागा निवडणूक आणावी: संजय राऊत
मुंबईच्या निवडणुकांविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, मुंबईत भाजपने एक तरी जागा निवडणूक आणावी. नितिन गडकरी यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. मोदी स्वतः निवडून येतील ही गॅरंटी नाही तर ते कसली गॅरंटी देत आहेत.
हे ही वाचा :