एक्स्प्लोर

G-20: छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-20 बैठकीला सुरुवात; लैंगिक डिजिटल तफावतवर चर्चा

G-20 Conference: W20 इंडियाने नॅनो, मायक्रो आणि स्टार्टअप उद्योगांमध्ये महिलांचे सक्षमीकरण यावर पहिले सत्र आयोजित केले होते.

Chhatrapati Sambhajinagar: जी-20 परिषदेच्या (G 20 Conference) निमित्ताने वुमेन-20 (W-20) इंडियाच्या बैठका छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आल्या असून, सोमवार (27 फेब्रुवारी, 2023)  पासून या बैठकांना सुरुवात झाली आहे. ज्यात W20 इंडियाने नॅनो, मायक्रो आणि स्टार्टअप उद्योगांमध्ये महिलांचे सक्षमीकरण यावर पहिले सत्र आयोजित केले. W20 इंडियाच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी या सत्राचा प्रारंभ करताना महिलांना त्यांचे स्वतःचे उद्योग उभारण्यात आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करणारा iWN365 उपक्रम सुरु केला.

GCMMF इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सर्वच क्षेत्रातील महिलांनी अमूलला भारतीय दुग्ध उद्योगाचा कायापालट करण्यात कशी मदत केली याचा पुनरुच्चार केला. त्यानंतर पॅनेल चर्चेत अमेरिकेतील व्हर्जिनिया लिटलजॉन दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या तर भारतातून जहनाबाई फुकन, तुर्कीच्या सेविम झेहरा काया, भारताच्या नताशा मजुमदार आणि जपानच्या सातोको कोनो उपस्थित होत्या. या सत्रात महिलांना कोणताही भेदभाव आणि पूर्वग्रह न ठेवता त्यांचा स्वतःचा उद्योग उभारण्याची मुभा देणारी चौकट आखण्यावर भर देण्यात आला. तर ‘हवामानानुसार कृतीत बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात जागतिक स्तरावर धोरण आखताना लिंगभेद करु नये हे अधोरेखित करण्यात आले. हवामान बदल संबंधी W-20 कृतीदलाच्या अध्यक्ष मार्टिना रोगाटो यांनी “हवामान बदल हा आता सिद्धांत राहिलेला नाही. दुर्दैवाने आता हे एक वास्तव आहे” यावर भर दिला.

या चर्चा सत्राच्या तज्ञ मंडळामध्ये, जीसीईएफच्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष एंजेला जू-ह्यून कांग, आशियाई विकास बँकेत लैंगिक समानता थीमॅटिक ग्रुपच्या प्रमुख सामंथा जेन हंग; छत्रपती संभाजीनगर येथील सेंटर फॉर अप्लाइड रिसर्च अँड पीपल्स एंगेजमेंट या संस्थेच्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नताशा जरीन; एसआयबीयूआर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सल्लागार एलेना म्याकोटनिकोवा तसेच युवा हवामान बदल प्रवर्तक आणि क्लायमेट लीडरशिप कोलिशन सल्लागार प्राची शेवगावकर यांचा समावेश होता.  

राजकीय आणि सार्वजनिक नेतृत्वात महिलांचा समान सहभाग

डब्ल्यू 20 इनसेप्शन मीटच्या तिसर्‍या सत्रात, राजकीय आणि सार्वजनिक नेतृत्वात तळागाळातील मुली आणि महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करण्यातील आव्हाने आणि मार्ग ओळखण्यासाठी ‘तळागाळातील महिला नेत्यांसाठी सक्षम पारिस्थितिक प्रणाली तयार करणे’ यावर लक्ष केंद्रित केले गेले. डब्ल्यू 20 कृती दलाच्या सह-अध्यक्ष डॉ. फराहदिभा टेनरिलेम्बा यांनी तळागाळातील नेतृत्व या सत्राचे संचालन केले. चर्चा सत्राच्या तज्ञ मंडळामध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्य प्रा. शमिका रवी, माजी भारतीय पोलीस सेवा अधिकारी आणि भारतातील तळागाळातील राजकीय नेत्या भारती घोष, वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या उपाध्यक्ष सुधाबेन सुरेशभाई पटेल, हार्वर्ड केनेडी स्कूलच्या महिला नेटवर्कच्या सह-अध्यक्ष फराह अरबे; सीमा ग्रामीण समितीच्या लिंग विशेषज्ञ सिबुले पोसवेओ, तळागाळातील संशोधक तसेच सेपियन्स संशोधन आणि विश्लेषण संस्थेच्या संस्थापक आणि संचालक आणि ग्राम्य या संस्थेच्या संस्थापक आणि संचालक रिमझिम गौर यांचा समावेश होता.  

भारतातील महिलांच्या नेतृत्वाखाली विशेष सत्र 

दिवस अखेर भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या विषयावरील विशेष सत्राने झाली. या सत्राची सुरुवात डॉक्टर संध्या पुरेचा यांनी केली. या चर्चासत्रात डब्ल्यू 20 इंडोनेशियाच्या अध्यक्ष ऊली सिलाही, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता बन्सुरी स्वराज सहभागी झाल्या होत्या. "माझ्या भारत भूमीमध्ये आपले स्वागत आहे. या भूमीत समृद्धीचे प्रतिनिधित्व लक्ष्मी देवी करते. धैर्याचे प्रतिनिधित्व देवी दुर्गा करते आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व देवी सरस्वती करते" असे बन्सुरी स्वराज यावेळी बोलताना म्हणाल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्हा दंडाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी उपस्थिताना शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची माहिती दिली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

अन् गुगलवर पाहून जी-20 परिषदेसाठी आलेल्या महिला सदस्या मस्जिदीत पोचल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget