एक्स्प्लोर

Farmer Success Stories : पैठणच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल; मिळतेय लाखोचे उत्पादन

Farmer Success Stories : आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न अवघ्या एकरभर क्षेत्रातून या शेतकऱ्याच्या पदरात पडले आहे.

Farmer Success Stories : पारंपरिक शेतीला फाटा देत छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठणच्या तालुक्यातील हर्षी येथील एका तरुण शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या पिकाचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाकडून शेड नेट हाऊस घेऊन 40 गुंठे जमिनीमध्ये शिमला मिरचीची लागवड केली. तर केवळ एक एकर क्षेत्रावर या तरुण शेतकऱ्याने शिमला मिरचीची लागवड करून आतापर्यंत पाच टन उत्पादन घेतले आहे. आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न अवघ्या एकरभर क्षेत्रातून त्यांच्या पदरात पडले आहे.  कृष्णा आगळे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करतोय. आधीच पारंपारिक पिकांना योग्य भाव मिळत नाही आणि त्यातच अतिवृष्टीमुळे शेत्कात्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. दरम्यान अशात पैठणच्या हर्षी येथील एका पदवीधर शेतकऱ्याने पारंपारिक पिकाला फाटा देत, एका एकामध्ये शिमला मिरचीचा योग्य पध्दतीने नियोजन करून यशस्वी प्रयोग केला आहे. 

आगामी काळात 18 ते 20 टन शिमला मिरचीचे उत्पादन 

कृष्णा आगळे यांचे बी.ए शिक्षण झाले आहे. तर त्यांचा पत्नी जयश्री आगळे यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना दहा एकर शेती आहे. शेतातील बोअरवेल, विहीरीला पाणी अल्पप्रमाणात होते. त्यामुळे पाण्याअभावी उत्पन्न खूपच कमी होत होते. गत दोन-तीन वर्षांपासून पावसाचे पाणी अनियमितता त्यामुळे खर्च जास्त उत्पन्न कमी होत होते. त्यामुळे काही तरी नवीन प्रयोग करून शेती करावी, असा आगळे यांनी विचार केला. यासाठी त्यांनी शिमला मिरची लावण्याचा निर्णय घेतला. शिमला मिरची लावण्यासाठी कृष्णा यांनी कृषी विभागातून 40 गुंठे जमिनीवर ग्रीन शेडनेट हाऊस उभे केले. या शेड हाऊसमध्ये 8 हजार रोपे आणून लावली. तर महिन्याभरापासून या शिमला मिरचीचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली अन् महिन्याकाठी एक लाख रुपये मिळाले आहेत. हा माल सुरत, पुणे, परभणी,  नांदेड,  हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. आगामी काळात 18  ते 20  टन शिमला मिरचीचे उत्पादन त्यांना अजून अपेक्षित आहे. 

एक एकर क्षेत्रातून सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न 

सध्या तीस रुपये किलोपर्यंतचा दर मिळाल्याने शिमला मिरचीचे दीड लाख रुपयेपेक्षा अधिकचे उत्पन्न आतापर्यंत प्राप्त झाले आहे. हा दर कायम राहिला किंवा त्यापेक्षा दर काही प्रमाणात कमीही झाला तरी एक एकर क्षेत्रातून सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न प्रयोगशील शेतीमुळे मिळणार आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असताना शिमला मिरचीचं प्रयोग यशस्वी ठरला असून, यात आई-वडील यांच्यासह पत्नीची मदत मिळाली असल्याचा कृष्णा म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Agriculture News : छत्रपती संभाजीनगरच्या गोळेगाव परिसरात मान्सूनपूर्व मिरची लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
Nashik Crime : नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
PM Modi Flight Entered the Pakistani Airspace : पॅरिसला जाताना पंतप्रधान मोदींचे विमानाचे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाऊण तास उड्डाण
पॅरिसला जाताना पंतप्रधान मोदींचे विमानाचे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाऊण तास उड्डाण
Aaditya Thackeray : शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 13 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सJaya Bachchan Rajya sabaha Video : राज्यसभेत खडाजंगी! जया बच्चन भयानक संतापल्या..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 13 February 2025Rajan Salvi On Eknath Shinde : शिवसेनाप्रवेशापूर्वी ठाण्यात भेट,शिंदेंनी साळवींना काय आश्वासन दिलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
Nashik Crime : नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
PM Modi Flight Entered the Pakistani Airspace : पॅरिसला जाताना पंतप्रधान मोदींचे विमानाचे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाऊण तास उड्डाण
पॅरिसला जाताना पंतप्रधान मोदींचे विमानाचे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाऊण तास उड्डाण
Aaditya Thackeray : शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
Eknath Shinde & Sanjay Dina Patil: एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटलांची हजेरी, चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटलांची हजेरी, चर्चांना उधाण
Embed widget