अंगणवाडी सेविकांना मिळणार नवीन मोबाईल; अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण होणार
Anganwadi worker : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हा परिषदेच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Anganwadi worker : कुपोषित मुले, मुलींचा आहार, गरोदर महिला व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती तसेच इतर माहिती संकलित करण्याची जबाबदारी असलेल्या अंगणवाडी सेविकांना सरकारने मोबाईल दिले होते. मात्र हे मोबाईल जुने झाल्याने सतत हँग होत होते. त्यामुळे हैराण झालेल्या अंगणवाडी सेविकांनी ते मोबाईल परत केले होते. तसेच नवीन मोबाईल देण्याची मागणी केली होती. यासाठी राज्यभरात आंदोलन देखील करण्यात आले. पण आता लवकरच अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हा परिषदेच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आल्याचं वृत्त 'पुढारी'ने दिलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन हजार अंगणवाडी सेविका आहेत. त्यांच्याकडून जिल्हा परिषद माध्यमांतून कुपोषित मुले, मुलींचा आहार, गरोदर महिला व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती तसेच इतर माहिती संकलित करण्यात येते होते. दरम्यान यासाठी अंगणवाडी सेविकांना सरकारने अँड्रॉईड मोबाईल दिले होते. पण हे मोबाईल जुने झाले. त्यामुळे सतत हँग होतात. तर अनेकदा मोबाईल नादुरुस्त झाल्यावर अंगणवाडी सेविकांना स्वतःच्या पैशातून दुरुस्त करण्याची वेळ येत होती. राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी या विरोधात आंदोलन केले होते. तसेच सरकारला मोबाईल परत पाठवले होते. त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मराठीचा पर्याय देण्याची मागणी...
यापूर्वी अंगणवाडी सेविकांना जे मोबाईल देण्यात आले होते, त्यात इंग्रजीत पर्याय होते. त्यामुळे आंगणवाडी सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. तर अॅप मराठीत असावे अशी मागणी देखील करण्यात आली होती. यासाठी राज्यातील अनेक भागात आंदोलन करण्यात आले होते. तर अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले होते. तसेच मराठी भाषा असलेले नवीन मोबाईल देण्याची मागणी देखील केली होती.
आंदोलनाला मिळाले यश...
अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल जुने झाल्याने, याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे अनकेदा मागणी करुन देखील मोबाईल बदलून दिले जात नव्हते. एकीकडे मोबाईल व्यवस्थितपणे चालत नव्हते, तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोबाईलवरील माहिती भरण्यासाठी सतत दबाव असायचा. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करत मोबाईल परत जमा केले होते. तसेच नवीन मोबाईल देण्याची मागणी केली होती. आता अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्याच्या हालचाली सुरु झाल्याने, त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
व्हिडीओ: महिला सरपंच पतीच पाहतो ग्रामपंचायतचं काम, अखेर वैतागलेल्या गावकऱ्यांनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'