Black fungus : ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्याच्या चिंतेत भर
राज्यात एकीकडे काही जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या अद्याप घटत नाही तर दुसरीकडे ब्लॅक फंगसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडली आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर होत असल्याचं चित्र आहे. पण राज्याचा विचार केला तर काही शहरांत कोरोनाची रुग्णसंख्या अद्याप नियंत्रणामध्ये येत नाही. कोरोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येच्या व्यतिरिक्त राज्यात ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात ब्लॅक फंगसचे आतापर्यंत 9,268 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ब्लॅक फंगसची बाधा झालेले 5091 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 2900 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण हे नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि मुंबईत आहेत. राज्यात ब्लॅक फंगसमुळे होणारा मृत्यू दर हा 12 टक्के इतका आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या मते. महाराष्ट्रात नागपूरचा ब्लॅक फंगस रुग्णसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतोय तर पुण्याचा दुसरा क्रमांक. नागपुरात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 5121 रुग्ण समोर आले आहेत तर 152 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुण्याचा विचार करता 1241 रुग्ण सापडले असून त्या ठिकाणी 163 लोकांचा मृत्यू झाला आहे. औरंगांबादमध्ये 1043 रुग्ण तर 99 जणांचा मृत्यू, नाशिकमध्ये 659 रुग्णसंख्या तर 72 लोकांचा मृत्यू, मुंबईमध्ये 620 रुग्णसंख्या तर 104 लोकांचा मृत्यू, सोलापुरात 589 रुग्णसंख्या तर 81 लोकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असून कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातील रुग्णसंख्या वाढतच आहे. या जिल्ह्यांतील सक्रिय रुग्णसंख्याही वाढत आहे. मुंबईमध्ये सध्या 11,088 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.
महत्वाच्या बातम्या :