Beed News: पतसंस्थेकडून नोटीस मिळताच बीडच्या शिक्षकाची आत्महत्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल
Beed Crime News: या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime News: बीड जिल्ह्यातील (Beed District) धारूर तालुक्यात एक्का धक्कादायक घटना समोर आली असून, दहिफळ केंद्रांतर्गत असलेल्या कासारी बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेवर करत असलेले शिक्षक (Teacher) नितीन लक्ष्मण पाटोळे (रा. आसरडोह, धारूर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. कोरोना काळात हप्ते थकले आणि तेव्हापासून सतत पतसंस्थेकडून वसुलीसाठी तगादा सुरू असल्यानं या सर्व परिस्थितीला कंटाळून नितीन पाटोळे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. तर या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोळे हे बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. माजलगाव येथील एका पतसंस्थेकडून त्यांनी 2019 मध्ये वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरुवातीला दहा हजार रुपये हप्तानं त्यांनी परतफेड केली. मात्र कोरोना काळात काही हप्ते थकले. मात्र जून 2012 पासून त्यांनी 10 हजार ऐवजी 15 हजाराने हप्ता भरला. तरीही पतसंस्थेकडून अधिकारी आणि वसुली पथक सारखेच तगादा करीत पुढील कारवाईची धमकी देत होते. त्यात मंगळवारी सकाळी पाटोळे यांना पतसंस्थेकडून नोटीस मिळाली. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे जामीनदार आणि शिक्षक सहकारी रावसाहेब तिडके यांनी दिली आहे.
पाटोळे यांच्या आत्महत्येने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या आरोपींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. त्यामुळे अखेर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत धारूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक ठाण मांडून होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते निघून गेले. तर या प्रकरणी मयत शिक्षक नितीन पाटोळे यांच्या पत्नी मंगल यांच्या फिर्यादीवरुन संस्थाचालक रविंद्र रामेश्वर कानडे, रामेश्वर गंगाधर कानडे, वसुली अधिकारी ओंकार काटकर, प्रशांत सोळंके या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
परिवार पडला उघड्यावर
नितीन पाटोळे यांनी आत्महत्या केल्याचे कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान नितीन पाटोळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांनी उचलेल्या या टोकाच्या भुमिकेमुळे परिवार उघड्यावर पडला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पाटोळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Beed News: अरेरे… हे काय झालं! भांडण एका एकाशी अन् धुतले दुसऱ्यालाच
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI