Aurangabad: मनपा प्रशासनाकडून 'क्लीन औरंगाबाद' मोहीम, स्वतः आयुक्त रस्त्यावर
Aurangabad News: फेब्रुवारी 2023 मध्ये शहरात G-20 परिषदेसंदर्भात विविध देशांचे शिष्ट मंडळ शहराला भेट ददेणार असून, त्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Aurangabad News: फेब्रुवारी 2023 मध्ये शहरात G-20 परिषदेसंदर्भात विविध देशांचे शिष्ट मंडळ शहराला भेट देणार असल्याने मनपा प्रशासनाकडून 'क्लीन औरंगाबाद' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या निमित्ताने मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात संपन्न झाली. तर सोबतच तात्काळ मिशन मोड पद्धतीने शहरात स्वछता मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त चौधरी यांनी स्वतः स्वच्छत मोहिमेची पाहणी केली.
औरंगाबाद शहरातील विविध ठिकाणावरील फुटपाथ, दुभाजक, रस्त्यालगतची व उड्डाण पुले त्यालगत वाढलेले गवत, त्यावर असणारी माती व शहरातील ग्रीन वेस्ट तसेच नेहमी कचरा पडणारी ठिकाणे स्वच्छ करण्यात येत आहे. याशिवाय 14 नोव्हेंबर पासून सुरू होणारी अनधिकृत फ्लेक्स बॅनर झेंडे इत्यादी काढण्याची मोहीम बाबत सूचना देखील मनपा आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अशी आहे 'क्लीन औरंगाबाद' मोहीम
- स्वछता केलेले दुभाजक: मिल कॉर्नर ते सारस्वत बँक, जामा मस्जिद ते किलेअर्क, शाहू महाराज पुतळा ते तापडिया नाट्य मंदिर.
- गवत काढलेले दुभाजक: टाऊन हॉल पूल, लिटिल फ्लॉवर हायस्कूल ते आंबेडकर कॉलेज,दिल्ली गेट ते चांदणे चौक.
- वेस्ट कचरा उचलणे: बाबा पेट्रोल पंप ते सतीश मोटर्स, म्युनिसिपल कॉलनी, जय भीमनगर रोड,महावितरण कार्यालय रोड, स्नेहनगर, रेल्वे स्टेशन रोड, हॉलिडे कॅम्पस.
- माती उचलण्यात आलेली दुभाजक: मिल कॉर्नर ते सारस्वत बँक,तापडिया नाट्य मंदिर ते सावरकर चौक, अंजली टॉकीज ते मिल कॉर्नर,क्रांती चौक ते सिल्लेखाना,बाबा पेट्रोल पंप ते रेल्वे स्टेशन रोड.
- स्वछ केलेले उड्डाणपूल: टाऊन हॉल,महावीर चौक, मोंढा नाका
- स्वछ केलेले फुटपाथ: कार्तिकी हॉटेल ते महावीर चौक, महावीर चौक ते समता नगर पाणी टाकी, मिल कॉर्नर ते सारस्वत बँक, मिल कॉर्नर ते मुख्य बस स्थानक, उस्मानपुरा सर्कल.
- नेहमी कचरा पडणारी ठिकाणची स्वछता: नेहरू भवन, टाऊन हॉल उड्डाणपूल खालील परिसर, चिनार गार्डन, स्नेह नगर, हॉलिडे होम्स ,शिवाजी हायस्कूल, आकाशवाणी, कैलास नगर स्मशान भूमी.
- ग्रीन वेस्ट उचलणे: काळा दरवाजा, श्रीकृष्ण नगर टीव्ही सेंटर पोलीस मेस रोड वरील जाळी मधील ग्रीन वेस्ट, रेल्वे स्टेशन रोड,पदमपुरा. या सोबतच सूतगिरणी चौक, चौरंगी हॉटेल कॉर्नर,रोपळेकर हॉस्पिटल परिसर येथे ही स्वछता मोहीम राबविण्यात आली.
Aurangabad: शहरातील सिटी बसची स्टेअरिंग माजी सैनिकांच्या हाती; देशातील पहिलाच उपक्रम