एक्स्प्लोर

Balasaheb Thorat: सरकारमधील गडबडीमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्याचे वातावरण; थोरातांनी सांगितले कारण...

Balasaheb Thorat : सरकारकडे पैसा नाही हे एकदा त्यांनी जाहीर तरी करून टाकले पाहिजे.

Balasaheb Thorat On Shinde Group: शिंदे गटाचे काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटात सहभागी होणार असल्याचे बोलले जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना, या सरकारमध्ये नक्कीच गडबड असल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहे. तर ज्या पद्धतीने सरकार चालत आहे, त्यामुळे शिंदे गटातील लोकांच्या मनात नैराश्य असल्याचं माझं देखील मत असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्य सरकार बनले कसं, सरकार झालं कसं, जनसामन्य माणसामध्ये त्यांच्याबद्दल काय मत आहे, हे पुन्हा-पुन्हा सांगायची गरज नाही. आधी तर सरकार बनत असतांना मंत्रीमंडळ बनायला तयार नाही, मंत्रीमंडळ झालं तर मंत्र्यांना खाते मिळत नव्हते आणि खाते मिळाल्यावर पालकमंत्री यांच्या नियुक्तीला उशीर असं सर्व काही पाहायला मिळत आहे.  दिल्लीच्या वाऱ्या करता-करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थकून गेले. त्यामुळे कोण काय बोलतोय,कोण काय करतोय कळतचं नसल्याचा टोला थोरात यांनी लगावला. 

बांधावर जाण्याची मंत्र्यांची हिम्मत नाही... 

पुढे बोलतांना थोरात म्हणाले की, खरं म्हणजे सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष असले पाहिजे, पण यांचं बिलकुल याकडे लक्ष नाही. राज्याचे प्रकल्प पळवून नेले जात आहे. मात्र त्याला उत्तर द्यायचे म्हणून काहीतरी उलटे आरोप करायचे असं चाललं आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार झाला आहे. सोयाबीन पूर्णपणे गेले असून, पीके पाण्यात आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. पण अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. तर काही ठिकाणी कृषी अधिकारी पंचनामे करण्यासाठी पैसे मागत असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे जितक्या काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, त्याप्रमाणे दुर्दैवाने दिले जात नाही. काय सुरु आहे हे जनतेला देखील समजत आहे. अनेक मंत्री नुकसानीच्या पाहणीसाठी जात नाही. कारण जनतेच्या समोर जाण्याची हिम्मत त्यांच्यामध्ये नसून, जनतेमध्ये रोष असल्याचं थोरात म्हणाले. 

आमच्याकडे पैसेचं नसल्याचं सरकराने स्पष्ट सांगावे...

ओला दुष्काळ करण्याबाबत सरकारकडे पैसा नसल्याचं बोलले जात आहे, यावर बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मग सरकारकडे पैसा नाही हे एकदा त्यांनी जाहीर तरी करून टाकले पाहिजे. त्यांनी पैसेच नसल्याचं स्पष्ट केले तर लोकं देखील म्हणतील जाऊ द्या आता सरकारकडे पैसे नाहीत त्याला काय ईलाज नाही. सरकार दिवाळखोरीत आहे का? याबाबत त्यांनी सांगावे, जनतेला मदत मिळणे महत्वाचे आहे. आता ती मदत कशी द्यायची याबाबत त्यांनी ठरवावे असेही थोरात म्हणाले. 

विमा कंपन्या पूर्णपणे नफा खोरीकडे वळाल्या...

अलीकडील काळात विमा कंपन्या पूर्णपणे नफा खोरीकडे वळाले असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना जी नुकसानभरपाई दिली पाहिजी ती दिली जात नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार असतांना आम्ही बीड पॅटर्न सुरु केले होते. मात्र केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली नाही. अन्यथा सरकार,कंपनी आणि शेतकरी तिघांना मदत होऊ शकली असती. त्यामुळे नुकसान झाल्यावर त्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळायलाच पाहिजे असे थोरात म्हणाले. 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नागपूरच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरने संपवल जीवन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट 
धक्कादायक! नागपूरच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरने संपवल जीवन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट 
आमच्या लढ्याला यश, सर्व अडथळे दूर झाले, OBC आरक्षणासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले भुजबळ
आमच्या लढ्याला यश, सर्व अडथळे दूर झाले, OBC आरक्षणासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले भुजबळ
रोहित पवारांना 'तो' व्हिडिओ कुणी पाठवला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्टच सांगितलं, आमदारांना टोलाही लगावला
रोहित पवारांना 'तो' व्हिडिओ कुणी पाठवला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्टच सांगितलं, आमदारांना टोलाही लगावला
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! नागपूरच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरने संपवल जीवन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट 
धक्कादायक! नागपूरच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरने संपवल जीवन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट 
आमच्या लढ्याला यश, सर्व अडथळे दूर झाले, OBC आरक्षणासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले भुजबळ
आमच्या लढ्याला यश, सर्व अडथळे दूर झाले, OBC आरक्षणासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले भुजबळ
रोहित पवारांना 'तो' व्हिडिओ कुणी पाठवला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्टच सांगितलं, आमदारांना टोलाही लगावला
रोहित पवारांना 'तो' व्हिडिओ कुणी पाठवला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्टच सांगितलं, आमदारांना टोलाही लगावला
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं
ओबीसी आरक्षणासह निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
ओबीसी आरक्षणासह निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Mahadev Munde : रोहित पवारांचा दावा, वाल्मिक कराडच्या मुलाचे आव्हान; महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी भारताबाहेर पळणार?
रोहित पवारांचा दावा, वाल्मिक कराडच्या मुलाचे आव्हान; महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी भारताबाहेर पळणार?
आई-वडिलांनी नवा मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना
आई-वडिलांनी नवा मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना
Kolhapur Municipal Corporation: '85 लाखांचा घोटाळा करूनही आयुक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करत नसतील, तर..' कोल्हापुरात ठाकरे गटाचा महापालिकेला घेराव
'85 लाखांचा घोटाळा करूनही आयुक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करत नसतील, तर..' कोल्हापुरात ठाकरे गटाचा महापालिकेला घेराव
Embed widget