एक्स्प्लोर

आई-वडिलांनी नवा मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhajinagar: आईने मोबाईल न दिल्याच्या रागात त्याने थेट खवडया डोंगर गाठला आणि उंचावरून उडी घेतली.

Chhatrapati Sambhajinagar: आईने मोबाईल का दिला नाही ? या क्षुल्लक कारणावरून अवघ्या 16 वर्षांच्या मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपला आयुष्य संपवण्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय . शहरा जवळील खवड्या डोंगरावरून तरुणांना उडी घेतल्याने त्याचा जागेच मृत्यू झाला .गेल्या काही दिवसांपासून अशाच कारणांमुळे घडलेल्या आत्महत्यांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पालकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे . (Sucide News)

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये "आईने मोबाईल का दिला नाही?" या क्षुल्लक कारणावरून तब्बल 16 वर्षांच्या मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपलं आयुष्य  संपवलय. शहराजवळील खवडया डोंगरावर ही घटना घडली आहे. मूळचा  बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. तो सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र, आईने "सध्या मोबाईल घेऊ नको" असं स्पष्ट सांगितल्याने तो नाराज झाला होता. आईने मोबाईल न दिल्याच्या रागात त्याने थेट खवडया डोंगर गाठला आणि उंचावरून उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

मुलांच्या भावना समजून घ्याव्यात: पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी

या प्रकारानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी अपील केलं आहे की, पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. "मुलांमध्ये आलेली अस्थिरता, निर्णय घेण्याची घाई आणि तात्कालिक रागाचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. पालकांनी संवाद वाढवावा, मुलांच्या भावना समजून घ्याव्यात," असं ते म्हणाले.

दरम्यान, मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांचेही मत अधिक गंभीर आहे. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून मोबाईलचे आकर्षण इतकं प्रचंड वाढलं आहे की, मानसोपचार विभागात येणाऱ्या दहा केसेसपैकी नऊ केसेस या मोबाईलशी संबंधित असतात. मोबाईल मिळत नाही म्हणून मुले नैराश्यात जातात, चिडचिड करतात आणि काही वेळा जीवघेणं पाऊल उचलतात.”

मानसोपचार तज्ञ काय सांगतात?

डॉ. शिसोदे पुढे सांगतात, ..मुलांना या वयात राग अनावर होतो, आजूबाजूला सगळ्यांकडे मोबाईल आहे मग माझ्याकडे का नाही माझे पालक मला का देत नाही असा विचार त्याच्या मनात येतो आणि त्यातून ते असले धोकादायक निर्णय घेऊ शकतात त्यामुळे पालकांनीही काळजी  घेणं गरजेचं आहे .“या वयात मुलांमध्ये राग अनावर होतो. त्यांना वाटतं, ‘सगळ्यांकडे मोबाईल आहे, मग माझ्याकडे का नाही?’ या असंतोषातून त्यांचं विचार करणं बंद होतं आणि ते धोकादायक निर्णय घेतात. म्हणूनच पालकांनी कठोरपणा न दाखवता संवादातून मार्ग शोधावा.” 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget