लोकसभेच्या भाजप-शिवसेना युतीबाबत 'हे' आदेश दिल्लीहून आले; शिरसाट यांचा महत्वाचा खुलासा
Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत कोणाला किती जागा मिळणार याची चर्चा सुरु असतानाच, संजय शिरसाट यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) तोंडावर असून, यासाठी राज्यातील सर्वच महत्वाच्या पक्षाकडून तयारी सुरु आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना (BJP-ShivSena) युतीत कोणाला किती जागा मिळणार याची चर्चा सुरु असतानाच, शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 सीट या शिवसेना, भाजप युतीने मजबुतीने लढायच्या आहेत. यासाठी सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर कोणाला कोणती जागा याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं दिल्लीचा आदेश असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कामाला लागले असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसनेकडे (शिंदे गट) होती, त्यामुळे ती पुन्हा शिवसेनेकडेच राहणार यासाठी आमचा प्रयत्न असणार असणार आहे. तर ही जागा आम्हाला सोडावी यासाठी भाजपकडून देखील प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनी प्रयत्न करणे साहजिक आहे, पण जागा शिवसेनेकडेच राहणार आहे. त्यामुळे शिवसेनाच ही जागा लढवणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 सीट या शिवसेना, भाजप युतीने मजबुतीने लढायच्या आहेत, असा दिल्लीचा आदेश असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.
निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा सर्वेक्षणानंतर ही सीट कोण जिंकू शकेल, याचा अंदाज आल्यानंतर त्या पक्षाला आणि नेत्याला उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे या जागेवरून कोणताही वाद वैगरे आमच्यात नाही. पण ही जागा शिवसेनाच लढवणार, फक्त आता केंद्रीय मंत्री भागवत कराड लढवणार की, रोहयो मंत्री संदिपान भुमरे लढवणार किंवा आणखी तिसरा कोण असणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असेही शिरसाट म्हणाले. तर अजून कोणाचाही नाव घोषित झाले नसून, सद्यातरी कोणी उमेदवार नाही, असेही शिरसाट म्हणाले.
मला सांगितल्यास लोकसभा लढवणार...
संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत असेच उमेदवारी दिली जाणार नाही. यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात काय समोर येणार, त्यानुसार उमेदवार ठरवले जाणार आहे. कोणेतरी सांगितले म्हणून, पटकन उमेदवार झाला असे होत नाही. जर मला लोकसभा निवडणुकीत उभं रहाण्याचे सांगितल्यास मी देखील तयार असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: