एक्स्प्लोर

Maharashtra New Cabinet : महाराष्ट्रात 'शिंदे पर्व'; एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात कोण? नव्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी

Maharashtra New Cabinet : शिंदे आणि फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनी जोर धरला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

Maharashtra New Cabinet : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) अखेर पडदा पडला. गेले काही दिवस धक्कातंत्र आणि अनपेक्षित घडामोडींनी रंगलेलं महाराष्ट्राचं सत्तानाट्य एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनं अखेर संपलं. आधी सरकारबाहेर राहू असं जाहीर केलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. शपथविधिनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री थेट गोव्यात पोहोचले आणि आमदारांबरोबर आनंद साजरा केला. शिंदे आज समर्थक आमदारांना घेऊन मुंबईत येणार आहेत. आता उद्यापासून विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन होणार आहे. त्यात बहुमत चाचणीबरोबरच विधानसभा अध्यक्षांची निवडही होणार आहे. या अधिवेशनात सरकारपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेचीच कसोटी लागणार आहे.

शिंदे आणि फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनी जोर धरला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोरांसह एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात एकूण 35 मंत्री असतील. त्यापैकी 12 बंडखोर आमदारांना मंत्री केलं जाऊ शकतं, तर 24 चेहऱ्यांना भाजपच्या कोट्यातून संधी मिळू शकते. 

भाजपच्या कोट्यातून कोणाची वर्णी? 

भाजपच्या कोट्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), आशिष शेलार (Ashish Shelar), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), विजयकुमार देशमुख (Vijay Deshmukh), गणेश नाईक (Ganesh Naik), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar), संजय कुटे (Sanjay Kute), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), डॉ. अशोक उईके (Ashok Uike), सुरेश खाडे (Suresh Khade), जयकुमार रावल (Jayakumar Rawal), अतुल सावे (Atul Save), देवयानी फरांदे (Devayani Farande), रणधीर सावरकर (Randhir Pralhadrao Savarkar) आणि माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तर याव्यतिरिक्त जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, राहुल कुल आणि गोपीचंद पडळकर यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडू शकते. 

शिंदे गटातील  कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?

महाविकास आघाडीत असताना शिंदे गटातील 9 मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली होती. त्या सर्व मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तर 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री करण्यात येणार आहेत. शिंदे गटातील अन्य संभाव्य मंत्र्यांमध्ये दीपक केसरकर (Deepak Vasant Kesarkar), दादा भुसे (Dada Bhse), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), बच्चू कडू (Bachchu Kadu), संजय शिरदत, संदीपान भुमरे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश आबिडकर यांचा समावेश आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर आता राज्यपालांनी बोलवलेल्या अधिवेशनात या सहकारची बहुमत चाचणी होणार आहे. मात्र या बहुमत चाचणी विरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणाऱ्या शिवसेनेला कोर्टानं दणका दिला आहे. आमदार निलंबनावर निर्णय येत नाही तोवर बहुमत चाचणी नको, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात प्रतोद सुनील प्रभू यांनी दाखल केली होती. तसंच बहुमत चाचणी आत्ता घ्यायची असेल तर आमदार निलंबनावर तातडीनं सुनावणी व्हावी अशीही मागणी केली होती. मात्र सुनावणी 11 जुलैलाच होणार, असं म्हणात सुप्रीम कोर्टानं तातडीच्या सुनावणीला नकार दिला आहे. एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा दिलासा आहे. दरम्यान, नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी आता अधिवेशन 2 आणि 3 जुलै ऐवजी 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget