एक्स्प्लोर

Dhananjay Munde: सहकार विभागाने सुरू केलेली सहकारी संस्था अवसायनाची कारवाई थांबवा; धनंजय मुंडे

Dhananjay Munde: विविध गावांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना अवसायनात काढण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

Dhananjay Munde: सहकार विभागाने सुरू केलेली सहकारी संस्था अवसायनाची कारवाई स्थगिती देण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. सहकार अधिनियमातील कोणत्याही तरतुदीनुसार चौकशी अथवा योग्य प्रकारे लेखापरीक्षण न करता राज्यातील विविध गावांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना अवसायनात काढण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. तर ही बाब गंभीर असून, गाव पातळीवर शेतकऱ्यांना पतपुरवठा करणारी एकमेव सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अवसायनात निघाल्या तर राज्यातील सहकार मोडीत निघेल.  तसेच हाच डाव यामागून नक्की सरकार खेळत असेल अशी माझी धारणा असल्याचे धनंजय मुंडे विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने बोलताना म्हणाले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सेवा संस्थेला दिलेले कर्ज आणि सभासदांकडून सेवा संस्थेला येणे असलेली बाकी यांच्यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. अशी तफावत निर्माण होण्याच्या पाठीमागे अनेक कारणे आहेत. राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये विशिष्ट कालावधीत कर्जावरील व्याज आकारणी बंद करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. व्याज आकारणी बंद करण्याच्या सूचना केवळ सेवा संस्थेने अंमलात आणल्या, मात्र त्यांना कर्ज देणाऱ्या बँकांनी या सूचनांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर ही अनिष्ट तफावत निर्माण झाली आहे. अशा प्रकारची अनेक कारणे या अनिष्ट तफावती वाढण्याच्या पाठीमागे आहेत. त्याची खऱ्या अर्थाने सहकार विभागाने चिकित्सा केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे, लेखापरीक्षण करून याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे, असे असताना केवळ 60  टक्के पेक्षा अधिक अनिष्ट तफावत असल्याचे कारण सांगून संस्थाच अवसयानात काढणं ही बाब अत्यंत चुकीची आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शासनाच्या या धोरणामुळे एकट्या बीड जिल्ह्यातील एकूण 750 सेवा संस्थांपैकी 309 सेवा संस्थांवर अवसायनाची कारवाई जिल्हा उपनिबंधकांनी सुरू केली आहे. एकाच वेळी 309  सेवा संस्थांना नोटिसा मिळाल्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नोटीस देण्यापूर्वी सहकार विभागाने कलम 83, कलम 84 अथवा इतर कोणत्याही तरतुदीनुसार चौकशी केली नाही. केवळ गाव पातळीवरील या संस्थाचे अस्तित्व संपवायचे आणि सहकार ताब्यात घेण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात आहे, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी

अनिष्ट तफावती मागील कारणांची मीमांसा करून योग्य पद्धतीने त्यावर तात्काळ उपायोजना करावी, सहकार विभागाने सुरू केलेली अवसायनाची कारवाई तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी या धनंजय मुंडे यांनी केली असून शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या :  

Anandacha Shidha : पाडवा तोंडावर आनंदाचा शिधा मात्र शासकीय गोदामांमध्येच पडून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाटपात अडथळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget