एक्स्प्लोर

Maharashtra Mumbai Rains LIVE : पुणे -पानशेत रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे.  या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

LIVE

Key Events
Maharashtra Mumbai Rains LIVE : पुणे -पानशेत रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

Background

Maharashtra Rain Updates LIVE : राज्याच्या अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंबीर स्थिती आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या भागात देखील पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत असल्याचं चित्र दिसत आहे.

आंबोली घाटात झाड कोसळलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या तिथे एकेरी वाहतूक सुरु आहे. दरम्या, झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सरु आहेत. 

अमरावती जिल्ह्यातही जोरदार पाऊस

अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या अप्पर वर्धा धरणाची 13 गेट उघडण्यात आली आहेत. तेरापैकी 9 गेट 70 सेंटिमीटरने तर चार गेट 60 सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून 1 हजार 392 दश लक्ष घन मीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. 

चंद्रपूर शहरात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वर्धा, अमरावती, भंडारा जिल्ह्यातून आणि चंद्रपूरच्या इरई धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.  शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीचे बॅक वॉटर सखल भागात शिरण्याची शक्यता आहे.

14:34 PM (IST)  •  16 Jul 2022

केजडी नदीला माशांचा महापूर, मासे बघायला लोकांची गर्दी 

केज तालुक्यातुन वाहणाऱ्या केजडी नदीला माशांचा महापूर आला असून नदी पात्रातील जिवंत मासे पाहण्यासाठी आणि धरण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. केज तालुक्यांतील शेलगाव गांजी येथील गावा लगतच्या वाहणाऱ्या केजडी नदीच्या फरशी पुला जवळच्या नदी पात्रात प्रचंड प्रमाणात जिवंत मासे वाहत आहेत. जणू काही माशांचा महापूर आल्यासारखे दिसत आहे. हे दृश्य म्हणजे नुसता जिवंत माशांचा खच पडलेला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. मासे पकडण्यासाठी गर्दी होत असून अवघ्या गुडघाभर पाण्यात एवढे प्रचंड मासे आणि त्यांचे विलोभनीय दृश्य म्हणजे जणू काही नदीला माशांचा पूर आल्या सारखे अत्यंत मनमोहक आणि मनाला मोहून जाणारे दृश्य आहे.

14:30 PM (IST)  •  16 Jul 2022

पुणे -पानशेत रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

पुणे -पानशेत रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. ओसाडे व सोनापूर या गावांच्या शिवेवर मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. एका खाजगी जागा मालकाने बांधलेली संरक्षक भिंत आणि दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवण्याचे काम सुरु केलं आहे. शनिवारची सुट्टी असल्यानं पानशेतकडे निघालेले अनेक पर्यटक अडकून पडले आहेत. या घटनेमुळे अवैध उत्खनन व बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

12:54 PM (IST)  •  16 Jul 2022

वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात विसर्ग सुरु, धरणसाठ्यात झपाट्यानं वाढ

Satara rain : वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात 6 हजार 168 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणातील पाणी पातळी सातत्यानं वाढत आहे. त्यामुळं धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून 9 हजार 144 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. नीरा नदीच्या पात्रात एकूण 15312 क्युसेक विसर्ग राहील. आज दुपारी 4 वाजता विसर्ग वाढवण्यात येणार आहे. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

11:46 AM (IST)  •  16 Jul 2022

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पूल खचले, वाहतुकीवर परिणाम

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पूल खचले आहेत. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भाग असणाऱ्या नांदेड जिल्ह्यालगत असणाऱ्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचा पार खोळंबा झाला आहे. किनवट-हिमायतनगर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्र,तेलंगणा, आंध्र प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. पण याही राष्ट्रीय महामार्गावर खैरगाव बुरकुलवाडी येथे पर्यायी पूल पुराच्या पाण्याने पूर्णतः वाहून गेला आहे. दरम्यान नव्याने काम सुरु असलेल्या पुलावरील खैरगाव व बुरकुलवाडी या दोन्ही बाजूंनी ट्रक फसल्याने वाहनांच्या रंगांच रांगा लागल्या आहेत. ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक मात्र सकाळपासून ठप्प झाली आहे. 

11:39 AM (IST)  •  16 Jul 2022

वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात मोठी वाढ, पण भंडारा गोंदियातील स्थिती नियंत्रणात

भंडारा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे स्थितीवर लक्ष ठेऊन गोसीखुर्द धरणातून टप्प्या टप्प्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. सध्या स्थितीत देखील पाण्याचा विसर्ग सुरु असून स्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. आता पाऊस जरी थांबला असला तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची आव्हाहन जिल्हा प्रशासनमार्फत करण्यात आले आहे. 
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget