Mumbai Accident : किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली ट्रकचा मोठा अपघात, वाहतूक मंदावली; Traffic पोलिसांची माहिती
Mumbai Accident : मुंबईकरांनो! किंग्ज सर्कलच्या दिशेने जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Mumbai Accident : मुंबईच्या (Mumbai) सायन किंग्ज सर्कलच्या पुलाला धडकून आज सकाळी एका ट्रकचा मोठा अपघात (Truck Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक अडकल्याने वाहतूक मंदावली आहे. यासंदर्भातील माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहिनीवर ट्रक अडकल्याने वाहतूक मंदावली आहे.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) November 6, 2022
due to a truck stuck Southbound under King's Circle railway bridge. Traffic is slow#MTPTrafficUpdates
मुंबईकरांनो! किंग्ज सर्कलच्या दिशेने जाणार असाल तर....
मिळालेल्या माहितीनुसार ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, रेल्वे पुलाचा संपूर्ण पिलर तुटून खाली पडला आहे. सकाळच्या दरम्यान सायन गांधी मार्केट येथील पुलाच्या एकाबाजूने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या अपघातात रेल्वे पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी आरपीएफ पोलीस दाखल झाले असून या अपघातग्रस्त ट्रकला बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून या परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन वाहनचालकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार