एक्स्प्लोर

राज्यभरातील पावसाचा आढावा

मुंबई आणि उपनगरांसह संपूर्ण राज्याला पावसाने सकाळपासून झोडपून काढले आहे. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई : मुंबई आणि उपनगरांसह संपूर्ण राज्याला पावसाने सकाळपासून झोडपून काढले आहे. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगली हजेरी लावली. राज्यात अनेक ठिकाणी समानाधामकारक पाऊस पडला आहे. मुंबईसह उपनगरात कोसळधार सकाळपासून सुरु असलेल्या पावसाची मुंबईसह उपनगरात कोसळधार सुरुच आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पावसामुळे लोकल वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तर सखल भागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या मुंबई उपनगरांसह ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. काजूपाड़ा परिसरात पाणी साचल्याने मुंबई अहमदाबाद महामार्ग बंद करण्यात आला आहे. रायगडमध्येही पावसाची संततधार सकाळपासून रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगडधील अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पालीनजीकच्या पुलावरुन पाणी गेल्याने वाकण ते खोपोली वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोकणात मुसळधार आज सकाळपासून कोकणालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कुडाळमधल्या कर्ली नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळपासूनच कोकणातील आंबोली, मांगेली, सावडाव आणि नापणे अशा धबधब्यांवर पर्यटकांनी गर्दी केली होती. पावसाचा जोर वाढत असल्यानं पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. अजूनही कोकणात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल औरंगाबादेत काही तास पाऊस झाला. गेल्या आठवडाभरापासून कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. मात्र मराठवाड्यात पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजानं बळीराजा चांगलाच सुखावला आहे. विदर्भातही मुसळधार पाऊस   विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अनेक नाले धो धो वाहू लागले आहेत. घोंसा परीसरात पाऊस आल्यामुळे मानकी, पेटुर नाल्याला मोठा पुर आला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन निवडीतील मोठी अपडेट; भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा 'दे धक्का
Maharashtra Live blog updates: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन निवडीतील मोठी अपडेट; भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा 'दे धक्का
Parinay Fuke : अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...
अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Chandrapur Crime News: चौकात मृतदेहाचं मुंडकं सापडलं; थोड्याच अंतरावर रेल्वे ब्रीजखाली धडाचा भाग, चंद्रपूरच्या प्रियदर्शनी चौकात भयानक दृश्य, नेमकं काय घडलं?
चौकात मृतदेहाचं मुंडकं सापडलं; थोड्याच अंतरावर रेल्वे ब्रीजखाली धडाचा भाग, चंद्रपूरच्या प्रियदर्शनी चौकात भयानक दृश्य, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
Embed widget