Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईतील लोकल वाहतूक सुरळीत, मध्य रेल्वेची माहिती
मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर दुसीरकडं गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावली.
LIVE
Background
Maharashtra Monsoon Rain LIVE : सध्या राज्यात काही भागात पावसानं दडी मारली आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात रात्ररभर पावसानं हजेरी लावली. त्यामुळं मुंबईकरांना उष्णेतापासून दिलासा मिळाला आहे. तसेच गडचिरोलीतही 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये देखील समाधानकारख पाऊस झाला. या ठिकाणी पडलेल्या पावसामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर दुसरीकडे अद्यापही पावसानं दडी मारली आहे. तेथील शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही प्रामुख्यानं घाट विभागांमध्ये काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
गडचिरोली 15 दिवसानंतर पावसाची हजेरी
तब्बल 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर गडचिरोलीत चांगला पाऊस झाला. याआधी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस समाधानकारक पाऊस पडला होता. या पावसाच्या आगमनानं उष्ण हवामानापासून नागरिकांना मिळाला दिलासा मिळाला आहे. अचानक बरसलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पेरण्या आहेत होत्या. दरम्यान पेरणीसाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे.
पेरणीसाठी दमदार पावसाची गरज
दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात पाऊस पडला आहे. याआधी 20 जून रोजी पाऊस पडला होता. या पावसामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अचानक बरसलेल्या पावसाने शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पेरण्या आहेत खोळंबल्या आहेत. केवळ 5 टक्केच पाऊस झाल्यानं बळीराजाला पेरणीसाठी दमदार पावसाची गरज आहे.
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक सुरळीत : मध्य रेल्वे
सकाळपासूनच मुंबईत तुफान पाऊस सुरु आहे. सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला या ठिकाणी जोरदार मध्ये पाऊस सुरू आहे. तरी सर्व लोकल योग्यपणे सुरु आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे पीओरओ यांनी दिली आहे.
पावसाने जोर पकडला आहे. सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला या सेक्शन मध्ये पाऊस सुरू आहे. ट्रेन्स सुरू आहेत. माहितीस्तव.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) June 30, 2022
It's raining heavily in CSMT, Dadar, Byculla, Kurla section. Trains are running. For information.#mumbairain @drmmumbaicr
कल्याण डोंबिवली मध्ये सकाळपासून पावसाची रीप रिप
गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसानं आज सकाळपासून कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात हजेरी लावली. गेल्या काही दिवस कल्याण डोंबिवलीत ऊन पावसाचा खेळ सुरु होता. त्यामुळं नागरिक उकाड्यानं त्रस्त झाले होते. पावसाची प्रतीक्षा कायम होती. आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत पावसानं हजेरी लावली. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी येत असून पावसाची रिप रिप सुरु झाली आहे. त्यामुळं वातावरणात गारवा पसरल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
दिल्लीत अखेर पावसाला सुरुवात, अनेक भागात जोरदार पाऊस
Monsoon: दिल्लीत अखेर पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळापासूनच दिल्लीच्या अनेक भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
#WATCH | Delhi wakes up to a sudden rainfall in several parts. Visuals from Dwarka Sector-16 C pic.twitter.com/xVHIZaVVWF
— ANI (@ANI) June 30, 2022
रस्त्यावर पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद
सकाळपासूनच मुंबईत पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. रसत्यावर पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान वाहतूकीचा मार्ग गोखले रोडकडे वळवण्यात आला आहे.
मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरु
आज सकाळपासून मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरुच आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.