एक्स्प्लोर

नोटा पकडल्या, गुंडांना निवडून आणू....सुभाष देशमुख आणि वाद

सुभाष देशमुखांचा सोलापुरातील टोलेजंग बंगला बेकायदेशीर असल्याचं सिद्ध झालं आहे. सुभाष देशमुख यांचा हा पहिलाच वाद नाही. यापूर्वीही अनेक वाद त्यांनी ओढवून घेतले आहेत.

मुंबई: राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत आहेत. त्यांचं ताजं प्रकरण म्हणजे, देशमुखांचा सोलापुरातील टोलेजंग बंगला बेकायदेशीर असल्याचं सिद्ध झालं आहे. तसा अहवाल सोलापूर महापालिका आयुक्तांनी हायकोर्टात सादर केला आहे. आयुक्तांनी 26 पानांचा मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. यामध्ये सुभाष देशमुख यांनी आरक्षित जागेवर  बांधकाम केल्याचा अहवाल पालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयात सादर केलाय.  या  26 पानी अहवालात सुभाष देशमुखांच्या बांधकामावर आक्षेप नोंदवण्यात आलेत. हा अहवाल देऊन पालिका आयुक्त अविनाश ढाकणे रजेवर गेल्याचं कळतंय. पालिकेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बंगला बांधल्यानं अडचणीत आलेल्या सुभाष देशमुखांनी आता थेट मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. सुभाष देशमुख यांनी एबीपी माझाला तशी प्रतिक्रिया दिलीय. सुभाष देशमुख यांचा हा पहिलाच वाद नाही. यापूर्वीही अनेक वाद त्यांनी ओढवून घेतले आहेत. सुभाष देशमुख आणि वाद नोटाबंदीनंतर नगरपालिका मतदानाच्या काळात पैसे पकडले नगरपालिका निवडणुकादरम्यान, उमरग्यामध्ये 16 नोव्हेंबर 2016 रोजी सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समुहाची 91 लाख 50 हजारांची रोकड उस्मानाबादच्या नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली. ज्यामध्ये एक हजाराच्या जुन्या नोटा होत्या. मात्र ही ऊसतोडणी कामगाराच्या टोळीला देण्यासाठी होती, असा दावा सुभाष देशमुख यांनी केला. विशेष म्हणजे ही रोकड लोकमंगलमधून 5 तारखेला काढण्यात आली होती. त्यामुळं नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही रोकड पुन्हा बँकेत जमा करणं आवश्यक होतं. मात्र तसं न करता ही रोकड ऊसतोड कामगारांना वाटण्यासाठी नेली जात असल्याचा दावा लोकमंगलनं केला होता. रक्कम लोकमंगलचीच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं जप्त केलेली 91 लाख 50 हजारांची रक्कम ही लोकमंगल मल्टिस्टेटचीच असल्याचा अहवाल सहाय्यक निबंधकांनी दिला. बँकेने दाखवलेल्या रेकॉर्डनुसार पैसे वेगवेगळ्या शाखेतून जमा करुन मुख्य शाखेकडे चालले होते. त्यावेळी म्हणजे बुधवारी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही 91 लाख 50 हजारांची रक्कम जप्त केली. शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज  लोकमंगल उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उजलल्याचं समोर आलं होतं. मात्र 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर 'लोकमंगल'ने शेतमजुराच्या नावावर घेतलेल्या कर्जाची रक्कम परस्पर फेडून टाकली. विशेष म्हणजे कर्ज फेडल्यानंतर 'देना बँके'नेही त्याला थकबाकीदार नसल्याचं पत्र जारी केलं आहे. त्यामुळे लोकमंगलने एकप्रकारे खोट्या कागदपत्रांनी कर्ज उचलल्याचं मान्यच केल्याचं समोर आलं आहे. सुभाष देशमुखांच्या 'लोकमंगल समुहा'वर सेबीची कारवाई  (18 मे 2018)  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या 'लोकमंगल समुहा'वर सेबीने टाच आणली आहे. सर्व संचालकांना पुढची चार वर्षे शेअर खरेदी विक्रीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. भागधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी सेबीने सुभाष देशमुख यांच्या 'लोकमंगल समुहा'वर जप्तीची कारवाई केली. देशमुखांसह त्यांच्या नातलगांनी केलेले व्यवहार ही भागधारकांची फसवणूक असल्याचा आरोप आहे. दुष्काळ असल्याचं दाखवून भागधारकांचे पैसे वापरुन संचालकांनी जमिनी स्वतःच्या नावे खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आधी गुंडांना निवडून आणू, मग त्यांना सुधारु : सुभाष देशमुख   (10 फेब्रु. 2017) वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे. अगोदर त्यांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचं काम करु, असं अजब वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. ते सोलापुरात एबीपी माझाशी बोलत होते.

सज्जन विरुद्ध दुर्जन अशी महाभारताची लढाई आहे, यात सज्जनांचा विजय होईल. भाजप मिनी विधानसभेत मुसंडी मारेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

कर्जमाफीच्या कामात चुका तर होणारच : सहकारमंत्री  (26 ऑक्टो 2017) कर्जमाफीसारख्या योजनेचं काम करताना चुका तर होणारच, असं अजब विधान करत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. बँकांनी दिलेल्या यादीत एकच खातं किंवा आधार कार्डावर शेकडो शेतकरी लाभार्थी असल्याचं समोर आलं आहे. बँकांकडून सरकारला ही माहिती मिळाली आहे. पती किंवा पत्नीच्या नावावर एकच आधार कार्ड असल्याचं समोर आलं आहे, असं देशमुखांनी सांगितलं. बँक, आयटी विभागांना आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत असून रक्कम बँकांना वर्ग केली जाईल, असंही सुभाष देशमुख म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget