RTE प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा निश्चित, प्रवेश अर्जाची मुदत 10 मार्चपर्यंत वाढवली
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेची निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली आहे.
मुंबई : आरटीई 25 टक्के अंर्तगत आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून यासाठी प्रवेश अर्जाच्या मुदतीत दहा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबतच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेताना किमान वयोमर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.
विविध प्रवेश अर्ज करताना नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली अशा विविध प्रवेश स्तरावरील वयोमर्यादेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेची निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली आहे. दरम्यान बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या सूचना देण्यात आल्याची माहिती संचालनालायकडून देण्यात आली आहे.
राज्यातील आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचलनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी जाऊ यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक संचलनालयाकडून सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि उपसांचालक याना शाळांना या सूचना निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील आर टी ई 2022-23 च्या प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे वयोमर्यादा आवश्यक
प्रवेशाचा वर्ग -
प्ले ग्रुप / नर्सरी -
- वयोमर्यादा - 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय - 4 वर्ष 5 महिने 30 दिवस
ज्युनिअर केजी -
- वयोमर्यादा - 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस
सिनिअर केजी -
- वयोमर्यादा- 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय - 6 वर्ष 5 महिने 30 दिवस
पहिली
- वयोमर्यादा- 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय -7 वर्ष 5 महिने 30 दिवस