एक्स्प्लोर

धनगर आरक्षणावर तोडगा निघणार? धनगर नेत्यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक

धनगर समाजाच्या आरक्षणप्रकरणी आज धनगर नेत्यांसोबत सरकार बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे.

अहमदनगर: चौंडी येथे गेल्या 16 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation)  आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी बुधवारपासून पाणी प्राशन करणं बंद केलं. मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र दोन दिवस उलटून गेले तरीही बैठक झाली नाही. याच्या निषेधार्थ आंदोलकांनी पाणी देखील सोडलंय. धनगर समाजाच्या आरक्षणप्रकरणी आज धनगर नेत्यांसोबत सरकार बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथिगृहात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत आरक्षणाचा तिढा सुटणार की आणखी तीव्र होणार हे पहाणं महत्वाचं असणार आहे,

अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे.धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.या आंदोलनाची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन सरकारने आज मुंबईत बैठक बोलावली आहे.या बैठकीसाठी यशवंत सेनेचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले आहे. तसंच आता या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडकडूनही पाठिंबा देण्यात आलाय

चौंडीतील शिष्टमंडळातील सदस्यांची नावे

  • बाळासाहेब दोडतले, राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत सेना
  • माणिकराव दांगडे, प्रदेशाध्यक्ष यशवंत सेना
  • गोविंद नरवटे, राष्ट्रीय संघटक यशवंत सेना
  • समाधान पाटील, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत सेना
  • नितीन धायगुडे, सरचिटणीस यशवंत सेना

अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर अशी उपोषणाला बसणाऱ्यांची नावं आहेत. रुपनवर यांची प्रकृती खालवल्यनेृ 19 तारखेला पुण्याला ससून रुग्णालयात हलवले, आधी त्यांना 15 तारखेला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर चार दिवसांनी त्यांना पुण्याला हलवण्यात आहे. सुरेश बंडगर यांनी 20 तारखेपासून पाणी देखील सोडले आहे.

सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने लढाई सुरु केली

चौंडी येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचं यावेळी माजी आमदार रामहरी रूपावर यांनी सांगितले . यावेळी बोलतांना रुपावर यांनी म्हटलं की, 'राज्य सरकार ना धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी शिफारस करतयं, ना बंद पडलेलं एनटी आरक्षण सुरु करत आहे. त्यामुळे हा धनगर समाजावर मोठा अन्याय होतोय. आता न्याय मिळण्यासाठी धनगर समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने लढाई सुरु केली आहे.

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्यभरात ओबीसी आणि धनगर समाजाकडून देखील आंदोलन करण्यात आले. तर सध्या धनगर समाजाकडून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला राज्य सरकार किती गांभीर्याने घेणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर यानंतर धनगर समाजाकडून कोणती पावलं उचलली जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा :

Ahmednagar : अक्षता पडल्या, लग्न झालं, मात्र देवदर्शनाऐवजी धनगर आरक्षण आंदोलनस्थळ गाठलं, नवदाम्पत्याचं कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget