Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2022 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2022 | रविवार
1. आशिया चषक टी- 20 स्पर्धेत आज भारत-पाकिस्तानचा महामुकाबला, टी-20 विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज, दोन्ही संघांना दुखापतीचा फटका https://bit.ly/3wzu9w4 भारत -पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/3AQAyFW
2. नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त, अवघ्या 13 सेकंदात भ्रष्टाचाराचे टॉवर जमिनीवर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई https://bit.ly/3CGFhez प्रशासनाकडून आजूबाजूच्या इमारतींवर पाण्याचा मारा, परिसरातील लोकांना घ्यावी लागणार काळजी https://bit.ly/3CBdqfO
3. पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त करणार, 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान पुलाचं पाडकाम https://bit.ly/3CBdsnW मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चांदणी चौकात पाहणी https://bit.ly/3QWNdN8
4. मागच्या सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तम, पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य https://bit.ly/3Alj5E4
5. गणेशोत्सवाआधीच्या शेवटच्या रविवारी सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती मंडपात नेण्याची लगबग, मूर्तीकार मूर्तींवर फिरवतायत अखेरचा हात तर विविध शहरातील बाजारपेठाही सजल्या https://bit.ly/3TnyigI
6. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर, शिंदे, फडणवीस आणि शेलारांच्या घरी गणपतीचं दर्शन घेणार, लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकापुढे माथा टेकवणार https://bit.ly/3QPsoTL
7. पक्षाचं नाव, चिन्हानंतर शिंदे - ठाकरेंमध्ये मध्यवर्ती कार्यालयावरुन राजकारण, शिंदे गटाकडून मध्यवर्ती कार्यालय म्हणून ठाण्यातील टेंभी नाक्यावरच्या आनंद आश्रमाचा पत्ता https://bit.ly/3cxuclj
8. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार, सूत्रांची माहिती, राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु https://bit.ly/3PUyRvw
9. येणारं वर्ष बाजरी वर्ष! मन की बात' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा, शेतकऱ्यांना तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करण्याचे आवाहन https://bit.ly/3Q0QWI1 सरोवर, तृणधान्य, सण ते डिजिटल इंडिया; पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3e1ZHVb
10. पंढरपुरातील गर्दी व्यवस्थापनासाठी 'काशी मॉडेल', सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा काशी दौरा, गर्दी व्यवस्थापनाबाबत काशीतल्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा https://bit.ly/3wBnqSl
ABP माझा डिजिटल स्पेशल
Shivsena Dasara Melava : शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची रंजक कहाणी https://bit.ly/3pNQKl1
सगळ्याच शिव्या या महिलांच्या संदर्भातच का? त्यांच्या सन्मानाचं काय? https://bit.ly/3cpJsRn
ABP माझा स्पेशल
Ganeshotsav 2022: सामाजिक भान जपणारा 'एक गाव, एक गणपती'; डहाणू तालुक्यातील उर्से गावातील गणेशोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष https://bit.ly/3PVpR9e
आधी देवाच्या पाया पडले, त्यानंतर दानपेटीचा गल्ला फोडला; चोरटे सीसीटीव्हीत कैद https://bit.ly/3pR5NKx
आज आहे 'रेड वाईन डे', रेड वाईनचे जितके फायदे तितकेच तोटे, वाचा सविस्तर... https://bit.ly/3CGJizE
प्रधानमंत्री जनधन योजनेला आठ वर्ष पूर्ण, 46 कोटींपेक्षा जास्त खाती उघडली, 67 टक्के खाती ग्रामीण भागात https://bit.ly/3CD41EE
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv