Maharashtra News : राज्यातील चेक पोस्ट बंद होण्याची शक्यता, गृह विभागाचे परिवहन विभागाला पत्र
Maharashtra News : परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra News : राज्यातील चेक पोस्ट बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, यासंबंधित गृह विभागाचे परिवहन विभागाला तसे पत्रही प्राप्त झाल्याची माहिती सुत्रांकडून समजत आहे. परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारचे मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पुढील 3 महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना
राज्यातील चेकपोस्टचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची नेमणूक करण्यात येणार असून पुढील 3 महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या पत्राचा आधार घेत गृहविभागाने हे पत्र परिवहन विभागाला पाठवण्यात आल्याचे समजते. चेकपोस्ट बंद होताना काय परिणाम होतील, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा देखील अभ्यास होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सीमा तपासणी नाके बंद करण्याची कार्यपद्धती काय असावी? चेकपोस्ट बंद केल्यानं राज्य सरकारवर काय आर्थिक बोजा पडेल? याचा अभ्यास होणार आहे.
5 सदस्यीय अभ्यास गटाची निर्मिती
दरम्यान, यासाठी परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय अभ्यास गटाची निर्मिती करण्यात येणार आहे, परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारचे मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे. रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर चेक पोस्ट बंद करण्याबाबत अभ्यासगट तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, हा अभ्यासगट चेक पोस्ट बंद केले तर त्याचे परिणाम काय होणार? तसेच त्यांच्या उपाययोजनांबाबत अभ्यास करून एक रिपोर्ट तयार करण्यात येईल, ज्यानंतर चेक पोस्ट बंद करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
औरंगाबादेत 9 मेपर्यंत जमावबंदी! 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार?