एक्स्प्लोर

Petrol Diesel : पेट्रोल पंप चालकांचा इंधन खरेदी न करण्याचा निर्णय; पेट्रोल पंप मात्र सुरु राहणार, असोसिएशनचं स्पष्टीकरण 

Petrol Diesel : आज ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार असून पेट्रोल पंप डीलर पेट्रोल-डिझेलची खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही.

Petrol Pump : आज ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार असून पेट्रोल पंप डीलर्स आज पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही. देशभरातील इंधन दराच्या मुद्यावरून पेट्रोल पंप चालक-मालकांनी हा निर्णय घेतला असून पेट्रोल पंप मात्र सुस्थितीत सुरु राहणार आहेत, त्यामुळे पेट्रोल-डिझेलची विक्री पंपांवर सुरुच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याचा फटका वाहनचालकांना तरी बसणार नाही यावरून स्पष्ट होते

वाहनचालकांना फटका बसणार?
आज जरी पेट्रोल पंप चालकांची खरेदी बंद असली तरी पेट्रोल पंप सुरु राहणार असल्यामुळे नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांना नियमित इंधन मिळणार आहे, त्यामुळे  ग्राहकांना कोणताही फटका बसणार नसल्याचं असोसिएशनकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान, देशभरातील पेट्रोल - डिझेल चालक मालकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना फटका बसणार त्याचं काय? असा सवाल मागील आठवड्यातच 'एबीपी माझा'नं 'फामपेडा'चे अध्यक्ष उदय लोध यांना केला. त्यावेळी बोलताना लोध यांनी 'सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारे याचा फटका बसणार नाही. प्रवाशांना त्रास होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली आहे. त्यामुळे 31 मे रोजी आम्ही पेट्रोल-डिझेलची खरेदी करणार नाहीत याचा अर्थ सामान्यांना मात्र इंधन मिळणार आहे. त्याची खबरदारी आम्ही घेतली आहे किंवा त्याबाबतच नियोजन करूनच हा निर्णय घेतल्याचं देखील लोध यांनी स्पष्ट केलं आहे.  त्यामुळे नो पर्चेसचा कोणताही फटका सामान्यांना बसणार नाही असेही त्यांनी म्हटले. वर्ष 2017 पासूनचं सारं गणित समजून घेतल्यास याबाबतचा सर्व तपशील ध्यानात येईल' अशी प्रतिक्रिया दिली होती. 

 केंद्र सरकारचा निषेध, इंधन खरेदीवर बहिष्कार कशासाठी?

देशात वाढलेले पेट्रोल - डिझेलचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. प्रवास खर्चात वाढ झाल्यानं महागाई देखील वाढू लागली. काही दिवसांपूर्वी तर महागाईनं आजवरचा उच्चांक गाठल्याची आकडेवारी देखील समोर आली होती. दरम्यान, या साऱ्या घडामोडींमध्ये केंद्र सरकरानं पेट्रोल - डिझेलच्या दरात मोठी कपात केली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देखील मिळाला. पण, त्यामुळे पेट्रोल - डिझेल चालक - मालक मात्र आक्रमक झाले आहेत. सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर सर्वांना हजारो कोटींचा फटका बसल्याचे आकडे देखील समोर आले. यामध्ये कमी म्हणून कि काय राज्य सरकारनं देखील दरांमध्ये कपात केली. पण, राज्य सरकारची दरवाढ फसवी आणि धुळफेक करणारी असल्याची टीका विरोधकांनी केली. 

यामुळे देशातील पेट्रोल - डिझेल चालक मालकांनी मोठा निर्णय
या साऱ्या घडामोडींमध्ये मात्र केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील पेट्रोल - डिझेल चालक मालकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशभरातील चालक - मालक 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून किंवा ऑईल डेपोमधून पेट्रोल - डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचावे किंवा ते पोहोचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं 'फामपेडा'चे अध्यक्ष उदय लोध यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं होतं. याची कल्पना सरकारला देखील दिली जाणार आहे. अर्थात या साऱ्या गोष्टी नियमांच्या आधारेच केल्या जाणार असल्याचं देखील लोध यांनी स्पष्ट केलं आहे. 

'नफा कमवता त्याचं काय?'

दरम्यान, 'नो पर्चेस'चा निर्णय घेताना तुम्ही वाढलेल्या दरांचं कारण देत आहात. पण, दरवाढ झाल्यावर मात्र तुम्ही नफा कमावता? याबाबत देखील 'माझा'नं लोध यांना सवाल केला. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, नफा कमावण्यासाठी प्रत्येक जण व्यवसाय करतो. आम्हाला देखील नफा मिळतो. पण, यामध्ये असलेली गुंतवणूक देखील मोठी असते. दर चढणे आणि उतरणे या बाबींवर देखील नफ्याची गणितं असतात. दर कपात झाल्यानंतर आम्हाला गुंतवणूक कमी करावी लागणार आहे ही बाब जमेची आहे. पण, एका रात्रीत दरकपात झाल्यानंतर होणारा तोटा देखील असतोच. दर कपात करताना ती अचानकपणे होता कामा नये. त्याची कल्पना मिळणं किंवा देणं गरजेचं आहे. जेणेकरून ग्राहकांना कोणताही त्रास न होता इधंन खरेदी केली जाईल. अशारितीचं अचानकपणे दरकपात केल्यास आम्हाला देखील मोठा फटका बसतो. ही च बाब सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक दिवसांचा नो पर्चेस करत आहोत. यामध्ये आम्ही कुठंही प्रवाशांना किंवा सर्वसामान्यांना अडवत नाहीत किंवा त्यांची गैरसोय करत नाहीत हि बाब लक्षात घ्यावी.  

संबंधित बातम्या

Petrol Diesel : पेट्रोल पंप चालकांचा इंधन खरेदी न करण्याचा निर्णय; वाहन चालकांना फटका बसणार?

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget