Money Laundering Case : नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना समन्स; EDकडून चार्जशीट दाखल करण्याची शक्यता
Money Laundering Case : नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना ईडीने अनेकदा समन्स बजावल्यानंतरही दोन्ही मुले चौकशीसाठी हजर झाली नाहीत.
Money Laundering Case : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 22 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना समन्स पाठविण्यात आले असून EDकडून लवकरच चार्जशीट दाखल करण्याची शक्यता वर्तविली जातेय.
नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना समन्स
दरम्यान, नवाब मलिक यांची दोन मुले अमीर मलिक आणि फराज मलिक यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. यांच्या दोन्ही मुलांना ईडीने अनेकदा समन्स बजावल्यानंतरही दोन्ही मुले चौकशीसाठी हजर झाली नाहीत. फराज मलिकला ईडीने 3 वेळा, अमीर मलिकला दोनदा समन्स बजावले होते. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मुलगा फराज मलिक (Faraz Malik) याला 15 मार्च रोजी समन्स बजावले होते. मात्र, तो ईडीसमोर हजर झाला नाही. त्यानंतर ईडीनं दुसरं समन्स दिलं होतं. त्यानंतरही फराज चौकशीसाठी हजर राहिला नाही.
लवकरच ईडी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता
ईडी आज ना उद्या आरोपपत्र दाखल करणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवाब मलिकवर आज किंवा उद्या ईडी आरोपपत्र दाखल करू शकते. मलिक यांना ईडीने त्यांच्या घरातून चौकशीसाठी बोलावले आणि नंतर अटक केली. याच प्रकरणात मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची काही मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी
'ईडी' ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे 'ईडी' ला तपासात आढळलं आहे. त्यानुसार 'ईडी' नं कारवाई करत मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली. याआधी न्यायालयाने मलिक यांना 'ईडी' कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपत असल्यानं मलिक यांना यानंतर मुंबई सत्र न्यायालायातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :
Nawab Malik Property Attached : नवाब मलिक यांची संपत्ती ED कडून जप्त, आठ मालमत्तांवर टाच
ED Enquiry in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र; मलिकांच्या प्रकरणाशी संबंधित कारवाई, नामांकित बिल्डर रडारवर