(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ED Enquiry in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र; मलिकांच्या प्रकरणाशी संबंधित कारवाई, नामांकित बिल्डर रडारवर
ED Raid in Mumbai : मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमध्ये ईडीचं पथक दाखल झालं आहे.
ED Raid in Mumbai : मुंबईत ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. यावेळी बडे बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. एवढंच नाहीतर, बांधकाम व्यावसायिकाचं राजकीय कनेक्शनही ईडी तपासणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबईसोबतच ठाण्यातही ईडी छापेमारी करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुंबईत कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंडमध्ये ईडीचं पथक दाखल झालं आहे. कुर्ला परिसरात ईडीनं छापेमारी केली आहे. ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफचे जवानही कुर्ल्यात दाखल झाले आहेत. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडमध्ये ही छापेमारी सुरु आहे. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील नवाब मलिक यांच्या गोवावाला कंपाउंड येथे ईडीची टीम पोहोचली आहे. या जमिनीत गैरव्यवहारामुळे नवाब मलिक तुरुंगात आहेत. त्यामुळे नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीच्या या छापेमारीमुळं राडकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी ईडी छापे टाकण्याच्या तयारीत आहे. पँडोरा पेपर्स प्रकरणी मोठा बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहे. या बांधकाम व्यावसायिकाचं राजकीय कनेक्शनही ईडी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड प्रॉपर्टी संदर्भात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आल्यानंतर ईडीनं अटक केली होती. गेल्या 23 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवस कोठडी मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यासंदर्भात आज कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड याठिकाणी ईडीचे काही अधिकारी आलं आणि त्यांनी या संदर्भात चौकशीला सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या संदर्भात काही तक्रारीसुद्धा आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज त्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी सीआरपीएफच्या गोवावला कंपाउंडला आले असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :